single-post

पहिल्याच पावसात गटाराची दयनीय अवस्था : शिवनेरी कॉलनी – अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील नागरिकांना मनस्ताप

२.५ कोटींच्या गटार प्रकल्पावर प्रश्नचिन्ह गटाचे पात्राची रुंदी मोठी पाहिजे, आमदार महेश शिंदे यांनी या कामाकडे तातडीने लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी

19 September, 2025

कोरेगाव | दि. १९ (जरंडेश्वर समाचार):कोरेगाव शहरांमध्ये शिवनेरी कॉलनी,अण्णाभाऊ साठे नगर ते बाजारपेठ परिसरात २.५ कोटी रुपयांच्या खर्चाने सुरू असलेला गटार बांधकाम प्रकल्प पहिल्याच पावसात गटर  बांधकाम पात्रा बाहेर पाणी रस्त्यावर वाहू लागल्यामुळे सुभाष नगर कडून येणारी वाहने आझाद चौकातील येणारी वाहने जागच्या जागी थांबली, पाणी गटर पात्राच्या बाहेर रस्त्यावर दोन ते तीन फुटाणे वर होते, पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे रस्त्यावर दगड गोटे विटा दिसून आले आहे. गटर बांधकाम होत असलेले ठिकाणी प्लास्टिक झाडाझुडपे असे सर्व घाण अडकलेली दिसत आहे.गटाराची रुंदी कमी ठेवण्यात आल्यामुळे पाणी पात्राच्या बाहेर जाऊन रस्त्यावर वाहू लागले आहे. यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, गटार बांधकामांची रुंदी वाढवण्यात यावे अशी मागणी शिवनेरी कॉलनी अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

नागरिकांची चिंता,शिवनेरी कॉलनी व अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील रहिवाश्यांनी सांगितले की, “गटाराची रुंदी कमी असल्याने पावसाळ्यात पाण्याचा प्रचंड वेग वाढत असतो. गटराची रुंदी कमी झाल्यामुळे ते पात्राबाहेर येईल आणि परिसरातील घरामध्ये पाणी जाऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भविष्यात मोठा त्रास होऊ शकतो.  कोरेगावचे लोकप्रिय, विकासकाचा कार्यसम्राट आमदार महेश शिंदे यांनी संबंधित ठेकेदाराशी बोलून गटाराची रुंदी तातडीने वाढवावी. आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रकल्पाची पार्श्वभूमी,नगरपंचायतीने स्वच्छता सुविधांसाठी मंजूर केलेल्या या गटार प्रकल्पाचा अंदाजे २.५ किलोमीटर लांबीचा भाग असून, या प्रकल्पामुळे सुमारे ५ हजार लोकसंख्येला फायदा होणार आहे. याआधी सातारा जिल्ह्यातील इतर भागात ३२५ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती. मात्र कोरेगावमध्ये अलीकडील झपाट्याने वाढलेल्या शहरीकरणामुळे हद्दवाढ क्षेत्रातील स्वच्छता प्रश्न गंभीर झाले आहेत.

प्रकल्पाचे तांत्रिक तपशील,अंदाजित खर्च: २.५ कोटी रुपये,लांबी: अंदाजे २.५ कि.मी.,लाभार्थी लोकसंख्या: ५,०००,मुख्य उद्देश: सांडपाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन व स्वच्छता सुधारणे,कालावधी: अंदाजे ६ महिने

या कामामध्ये तातडीने सुधारणा न झाल्यास व गटाराची रुंदी वाढवली गेली नाही, तर पावसाळ्यात रस्त्यावर पाणी वाहून वाहतूक ठप्प होईल तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होईल, .कोरेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी याकडे तातडीने लक्ष घालावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असेही सांगण्यात आले आहे

कोरेगाव येथील २.५ कोटींचा गटार प्रकल्प हा परिसराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचा असला तरी कामाच्या गुणवत्तेवर व रचनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. योग्य दुरुस्ती व तांत्रिक बदल न झाल्यास नागरिकांच्या समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.