कराड-मलकापूरला मिळणार हरित भेट
नमो उद्यान योजनेत दोन कोटींचा निधी मंजूर
18 September, 2025
कराड, | दि.१८(जरंडेश्वर समाचार) : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘नमो उद्यान योजने’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील कराड व मलकापूर या दोन्ही शहरात लवकरच आकर्षक उद्याने साकारली जाणार आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेत दोन्ही शहरांचा समावेश झाला असून, प्रत्येकी एक कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
हरित पट्टा आणि आधुनिक सुविधा,नमो उद्यान ही योजना केवळ हरित पट्ट्यांपुरती मर्यादित नसून, ती शहरी जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. लहान मुलांसाठी खेळणी,युवक- महिलांसाठी व्यायाम साधने,,ज्येष्ठांसाठी वॉकिंग ट्रॅक व विश्रांती स्थळे,
अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांना शुद्ध हवा, निरोगी वातावरण आणि प्रदूषणमुक्त परिसर मिळण्यास मदत होईल.
राज्यस्तरीय स्पर्धा आणि बक्षिसे,या योजनेत उभारल्या जाणाऱ्या उद्यानांपैकी उत्कृष्ट उद्यानांसाठी राज्य शासनाने स्पर्धा जाहीर केली आहे..पहिला क्रमांक – ५ कोटी रुपये,,दुसरा क्रमांक – ३ कोटी रुपये,तिसरा क्रमांक – २ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे
“कराड-मलकापूरचे सौंदर्य वाढणार”,आमदार डॉ. भोसले म्हणाले, “कराड आणि मलकापूर शहरांचा या योजनेत समावेश व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आता ही उद्याने उभारली गेल्यानंतर शहरांचे सौंदर्य तर वाढेलच, पण नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होईल.”