राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत मोठा दावा: मतदार यादीत घोटाळा, निवडणूक आयोगाला एका आठव्यात डेटा जाहीर करण्याची मागणी
मतदार यादीतील अनियमितता आणि सॉफ्टवेअरद्वारे मतचोरीचा गंभीर आरोप
18 September, 2025
नवी दिल्ली दि.१८(जरंडेश्वर समाचार) – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतदार यादीत अनियमितता आणि मतघोटाळ्याचे गंभीर आरोप केले. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला एका आठवड्याच्या आत मतदार यादीचा डेटा जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मुख्य आरोप: मतदार यादीतून काँग्रेसचे मत कमी, विरोधकांचे वाढवले,राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत खालील प्रमुख मुद्दे मांडले:,मतदार यादीतील फेरफार: काँग्रेसच्या मतदारसंघातील मतदारांची नावे डिलीट, तर विरोधकांच्या मतदारसंघात नावे समाविष्ट.
सॉफ्टवेअरद्वारे मतचोरी: बुथ मतदार यादीतील पहिल्या मतदाराच्या नावानं अर्ज करत इतर मतदारांची नावे यादीतून हटवण्यात आली.,बोगस मतदार: एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये नोंदणीकृत.फॉर्म ६ चा गैरवापर: १८–२५ वयोगटातील नवीन मतदारांसाठी फॉर्म ६चा दुरुपयोग.
महाराष्ट्रातील असामान्य मतदार वाढ: पाच महिन्यात ४० लाख मतदारांची वाढ, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अधिकराहुल गांधींनी काही ठोस उदाहरणेही पत्रकार परिषदेत सादर केली:
बंगळुरू मतदारसंघ: १,२५,००० मतांची चोरी; ११,९६५ मतदारांची नावे बनावट, ४०,००९ मतदारांचे पत्ते खोटे, ४,१३२ मतदारांची फोटो चुकीची.
आदित्य श्रीवास्वत उदाहरण: एकाच व्यक्तीचे नाव कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये नोंदणीकृत.,महाराष्ट्र: मतदार संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त,आलंद मतदारसंघातील घोटाळा: ६०१८ नावं वगळण्याचा प्रयत्न
कर्नाटकच्या आलंद मतदारसंघाचे उदाहरण देत राहुल गांधी म्हणाले, “६०१८ मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी अर्ज त्यांच्या स्वत:च्या नावाने केले गेले, पण हे अर्ज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक भरले गेले. मोबाईल क्रमांक कर्नाटकबाहेर वेगवेगळ्या राज्यांमधले होते. ही कारवाई काँग्रेस विरोधी मतांसाठी करण्यात आली.”
कायदेशीर जबाबदारी: मतदार यादी निवडणुकीपूर्वी दुरुस्त करणे ही आयोगाची कायदेशीर जबाबदारी.
एसआयआर प्रक्रिया: बिहारमध्ये विशेष सखोल फेरतपासणी यशस्वीरित्या पार पाडली गेली.
डुप्लिकेट एपिक क्रमांक: देशभरात सुमारे तीन लाख लोकांचे एपिक क्रमांक डुप्लिकेट, बदलण्यात आले.
भाजप: खासदार दिनेश शर्मा यांनी राहुल गांधींच्या आरोपांना ‘निराधार’ ठरवले.
आरजेडी: तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर जिवंत मतदारांची नावे वगळण्याचा आरोप केला.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेने निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवर पुन्हा एकदा चर्चा सुरु केली आहे. निवडणूक आयोगाला एका आठवड्याच्या आत डेटा जाहीर करण्याची मागणी राजकीय तणाव वाढविणारी ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयातील खटला आणि ‘व्होटर अधिकार यात्रा’ या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाची पुढील कारवाई आणि राजकीय पक्षांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरेल.