साताऱ्यात बौद्ध बांधवांचा जोरदार मोर्चा – गया येथील बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी
बुद्ध विहाराचा ताबा – बौद्ध समाजाच्या व्यवस्थापनाला देण्यात यावा. साताऱ्यात जोरदार आंदोलन
18 September, 2025
सातारा, १८ (जरंडेश्वर समाचार) –सातारा जिल्ह्यातील दलित बांधवांनी बौद्ध गयास्थानावरील विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा समता सैनिक दल या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या नेतृत्वाखाली पार पडला.
मोर्चात कार्यकर्त्यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "होश में आओ होम में आओ" अशा घोषणा देत समाजाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक अधिकारांचा आवाज बुलंद केला.
मोर्च्यात विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे चंद्रकांत खंडाईत,ऑल इंडिया पंचर सेना जिल्हाध्यक्ष आदित्यराव गायकवाड,मोर्च्याची सुरुवात डॉ. आंबेडकर स्मारक येथून झाली आणि शहरातील विविध चौक व स्मारकांमधून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली.
1 कमानी हौद,देवी चौक. मोती चौक,गोलबाग (वळसा) पाचशे एक पाटी,. पोलीस मुख्यालय, पोवई नाका
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (अभिवादन)
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत नेत्यांनी खालील ठळक मागण्या मांडल्या:
1. बुद्ध विहाराचा ताबा – बौद्ध समाजाच्या व्यवस्थापनाला देण्यात यावा.
2. सामाजिक न्याय – दलित व वंचित समुदायांना संविधानातील अधिकारांची अंमलबजावणी व्हावी.
3. ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित स्थळांचे जतन केले जाते
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच शांततेत व शिस्तीत मोर्चा पार पडल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारून दलित समाजाला नवा सामाजिक व धार्मिक मार्ग दाखवला. साताऱ्यातील हा मोर्चा त्याच ऐतिहासिक विरासतची पुढची कडी मानला जात आहे.
सातार्यातील हा मोर्चा सामाजिक न्याय आणि धार्मिक अधिकारांच्या चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जर प्रशासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला तर दलित समाजाचा विश्वास वाढेल, अन्यथा आंदोलन उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.