पिंपोडे खुर्द : विद्यार्थ्यांचा संताप उसळला, एसटी बस अडवून आंदोलन
बस वेळेवर धावा’; पिंपोडे खुर्दातील विद्यार्थ्यांचा इशारा .;प्रशासनाच्या दिरंगाईवर विद्यार्थ्यांचा रोष; एसटी सेवेत सुधारणांची मागणी
11 September, 2025
पिंपोडे खुर्द : विद्यार्थ्यांचा संताप उसळला, एसटी बस अडवून आंदोलन
कोरेगाव (जरंडेश्वर समाचार): कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथे शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत एसटी बस अडवली. मागील काही दिवसांपासून बससेवेतील अकार्यक्षमता आणि वेळापत्रकातील विसंगतीमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला.
प्रवासात विद्यार्थी त्रस्त,गावातील अनेक विद्यार्थी कोरेगाव, सातारा आणि इतर ठिकाणी शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी रोज एसटीवर अवलंबून असतात. मात्र बस वेळेवर न येणे, बसमधील अतिगर्दी, तसेच बसचालक व वाहकांचा मनमानी कारभार या कारणामुळे विद्यार्थ्यांना उशिरा शाळा-कॉलेजमध्ये पोहोचावे लागते. यामुळे शिक्षणावर परिणाम होतो आहे.
मागण्यांची यादी,आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशासनापुढे काही ठोस मागण्या मांडल्या—
सकाळी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी.
बस उशिरा धावू नयेत, वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे.
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुविधा देण्याबाबत निर्णय घ्यावा.
विद्यार्थ्यांचा संताप पाहता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की पुढील काही दिवसांत समस्येवर ठोस तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले.