single-post

कोरेगांवचा सुपुत्र हर्षवर्धन बर्गे भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर

कोरेगाव ग्रामस्थानी केला जल्लोषात सत्कार;आमदार महेशदादा शिंदे विचार मंच आणि माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

11 September, 2025

कोरेगांव (जरंडेश्वर समाचार) : अथक परिश्रम, संघर्षमय वाटचाल आणि कुटुंबियांच्या भक्कम पाठबळावर भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळविणाऱ्या कोरेगावच्या सुपुत्र हर्षवर्धन विजय बर्गे याचे कोरेगांव शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. जुनीपेठ विभागातील जुन्या अकरा परिसरातील सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या हर्षवर्धनने आपल्या चिकाटी, मेहनत आणि सातत्यपूर्ण संघर्षाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

संघर्षातून गवसले यश,हर्षवर्धन बर्गे याने पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेत असताना राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) माध्यमातून सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले. बिहारमधील गया येथील प्रशिक्षण केंद्रात त्याने खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले असून नुकतेच त्याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे.

 या यशाबद्दल खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते हर्षवर्धन बर्गे याचा सत्कार करण्यात आला व गौरव करण्यात आला. आमदार महेशदादा शिंदे स विचार मंच आणि माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती,या वेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, राहुल बर्गे उपनगराध्यक्ष, माजी सरपंच ॲड. प्रभाकर बर्गे, माजी विरोधी पक्षनेते महेश  बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपसरपंच सुरेश बर्गे, मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन गजानन बर्गे, संचालक संजय बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे यांच्यासह परशुराम बर्गे, बच्चुशेठ ओसवाल, संतोष बर्गे, अर्जुन आवटे, सूर्यकांत बर्गे, ॲड. चंद्रशेखर बर्गे, काकासाहेब बर्गे, प्रतापराव बर्गे, सयाजी बर्गे, संजय बर्गे, आनंदराव बर्गे, दिलीप बर्गे, संतोष नलावडे, अभिजीत बर्गे, विजय घोरपडे, विठ्ठलराव काटे, विजयराव बर्गे, प्रदीप बर्गे, शरद बर्गे, आबा बर्गे, मधुकर ननावरे, सुभाष मल्लकमेर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक व आभार प्रदर्शन,प्रास्ताविक प्राचार्य अरुण बर्गे यांनी केले, तर आभार माजी नगरसेवक सचिन बर्गे यांनी मानले.