शिवजयंतीनिमित्त प्रतापगडावर दि.१९ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिवजयंतीनिमित्त प्रतापगडावर दिमाखदार सोहळा
18 February, 2025
सातारा, दि. १७ : सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही शिवजयंतीनिमित्त किल्ले प्रतापगडावर बुधवारी दि. १९ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा परिषदेची ठराव समिती प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. शिवजयंती प्रतापगडावर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
प्रतापगडावर छत्रपती शिवाजीमहाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्यामुळे , जयंती सोहळा यशस्वी करणेकामी महाबळेश्वर पंचायत समिती, वाई पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सातारा कार्यक्रमाची तयारी करीत आहेत.यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी याकामी विविध विभागांचा आढावा घेऊन महत्त्वपुर्ण सुचना केलेल्या आहेत.त्यानुसार सर्व विभागांनी समन्वय साधत नियोजन केले आहे. .
किल्ले प्रतापगडावर होणाऱ्या शिवजयंती सोहळ्या दरम्यान बुधवारी सकाळी ७ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते श्री भवानी मातेस अभिषेक व नंतर महापूजा होणार आहे. श्री भवानी मातेची महापूजन याशनी नागराजन यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखीतून मिरवणूक निघणार आहे .जि.प.ठराव समितीची सभा प्रतापगडावर होणार असून जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी निलेश घुले केले आहे.