single-post

छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची आकर्षक ठेव योजना जाहीर -रामभाऊ लेंभे

ग्राहकांसाठी विविध पर्याय, आकर्षक व्याजदरांची घोषणा

09 September, 2025

​छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची ग्राहकांच्यासाठी आकर्षक ठेव योजनां-रामभाऊ लेंभे
​पिंपोडे बुद्रुक, (जरंडेश्वर समाचार): -छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने   ग्राहकांसाठी विविध नवीन आणि आकर्षक ठेव योजना जाहीर केल्या आहेत. असे संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी सांगितले आहे.
          या योजनांमध्ये स्पर्धात्मक व्याजदर आणि ग्राहकांच्या विविध गरजा विचारात घेऊन तयार केलेले पर्याय उपलब्ध आहेत.

                      या योजनेत श्री गणेशा नवीन ठेव योजना (111 आणि 211 दिवसांच्या मुदतीसाठी विशेष व्याजदर), सौभाग्य लक्ष्मी ठेव योजना (18 महिन्यांच्या मुदतीसाठी 1.50% अधिक व्याजदर), पेन्शन ठेव योजना (दरमहा पेन्शन स्वरूपात उत्पन्न), अरुणोदय ठेव योजना (9% व्याजदर), आणि छत्रपती संभाजीराजे ठेव योजना (1 वर्षाच्या मुदतीवर 9.25% इतका सर्वाधिक व्याजदर) यांचा समावेश आहे.
​या योजनांमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य पर्याय निवडता येतील. अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले आहे.