जनसंवाद’ अभियानातून जनतेच्या हक्कांसाठी नवा उपक्रम
हडपसरपासून राज्यभर ‘जनसंवाद’ अभियानाला सुरुवात ; नागरिकांच्या तक्रारींसाठी राष्ट्रवादीकडून विशेष उपक्रम
11 September, 2025
‘जनसंवाद’ अभियानातून जनतेच्या हक्कांसाठी नवा उपक्रम
हडपसर (जरंडेश्वर समाचार): -जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यावर त्वरित उपाय शोधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ‘जनसंवाद’ या विशेष अभियानाची सुरुवात होत आहे. हडपसर येथून १३ सप्टेंबरला या अभियानाचा शुभारंभ होणार असून त्यानंतर राज्यभर हे अभियान राबवले जाणार आहे.
नागरिकांना त्यांच्या समस्या सोप्या पद्धतीने मांडता याव्यात यासाठी ७८८८५६६९०४ या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअॅप करून समस्या नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या समस्या थेट पक्षाकडे पोहोचतील आणि त्यावर तातडीने पाठपुरावा केला जाईल.
कार्यक्रमादरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधतील. “मी स्वतः जनसंवादात सहभागी होऊन प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहीन. जनतेच्या न्याय-हक्कांसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” असे पक्षाकडून सांगण्यात आले.
“जनसंवादातून जनविकास साधणे हा आमचा ध्यास असून चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा संदेश या अभियानातून देण्यात आला आहे.