जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त अॅक्टीव्ह लाईफ क्लिनिकतर्फे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन
अॅक्टीव्ह लाईफ मल्टिस्पेशालिटी फिजिओथेरपी क्लिनिकने एक विशेष मोफत तपासणी आणि मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन
09 September, 2025
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त अॅक्टीव्ह लाईफ क्लिनिकतर्फे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन
कोरेगाव दि.८(जरंडेश्वर समाचार): जागतिक फिजिओथेरपी दिनाचे औचित्य साधून, सातारा जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या डॉ. रोहित बर्गे यांच्या अॅक्टीव्ह लाईफ मल्टिस्पेशालिटी फिजिओथेरपी क्लिनिकने एक विशेष मोफत तपासणी आणि मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन केले आहे. सोमवार, ८ सप्टेंबर ते सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत चालणाऱ्या या शिबिरात मानदुखी, खांदेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांवर मोफत तपासणी व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
क्लिनिकचे संस्थापक डॉ. रोहित गजानन बर्गे (MPTH, BPTA, COMT) हे गेल्या १२ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर अनेक रुग्णांना फिजिओथेरपीच्या माध्यमातून उपचार देत आहेत. फिजिओथेरपी ही एक अशी उपचार पद्धती आहे, ज्यात कोणत्याही औषधांशिवाय किंवा शस्त्रक्रियेशिवाय सांधेदुखी, हाडांचे विकार, संधिवात तसेच लकवा (पॅरालिसिस) यांसारख्या गंभीर आजारांवर दुष्परिणाम विरहित उपचार शक्य आहेत. वर्षानुवर्षे वेदना सहन करणाऱ्या आणि ऑपरेशन टाळू इच्छिणाऱ्या रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
या शिबिरामध्ये अत्याधुनिक मशीन्स आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या दोन्ही शाखांमध्ये रुग्णांना तपासणी आणि योग्य सल्ला मिळेल. शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. मोफत तपासणीव्यतिरिक्त कोणत्याही पुढील उपचारांसाठी वेगळे शुल्क आकारले जाईल, याची नोंद घ्यावी.
संपर्क व शिबिराचे ठिकाण,कोरेगाव शाखा: डॉ. गोसावी हॉस्पिटलजवळ, लक्ष्मीनगर, कोरेगाव.,वेळ: सकाळी ११ ते दुपारी २.,संपर्क: ९०९६६ ६७३३३सातारा शाखा: बोकील नेत्ररुग्णालयाजवळ, सिव्हील रोड, सातारा.,वेळ: दुपारी ३ ते ५.,संपर्क: ९०९६६ ६९३३३,इच्छुक व्यक्तींनी अपॉइंटमेंट घेऊनच शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रोहित बर्गे यांनी केले आहे.