single-post

मराठा आरक्षण लढा : जरांगे पाटील उपोषणानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, कार्यकर्त्यांचा त्याग विसरू नये – श्रेयासाठीची चढाओढ थांबवावी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जीवाची बाजी – कार्यकर्त्यांचे त्याग आणि नेत्यांचा श्रेयवाद..!

05 September, 2025

सातारा दि.(सुरेश बोतालजी संपादक जरंडेश्वर समाचार):-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जीवाची बाजी – कार्यकर्त्यांचा त्याग  आणि संघर्ष विसरू नये,आरक्षणाच्या या लढ्यात जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र रस्त्यावर थांबून संघर्ष केला. पावसात चिंब भिजले, उन्हात रापले, उपाशीपोटी रात्रंदिवस घालवले. मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत, गावोगावी कार्यकर्त्यांनी आपली शक्ती पणाला लावली. हा लढा सहज नाही, तर कार्यकर्त्यांच्या रक्तघामाने सिंचन झालेला आहे.

श्रेयासाठी धडपड नको...आज जेव्हा या लढ्याला यश मिळण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे, तेव्हा काही राजकीय नेते आणि पक्ष या प्रश्नावर स्वतःचे श्रेय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण "हा आमच्या पक्षाच्या दबावामुळे झाले" म्हणत आहेत, तर काही नेते "आमच्या पुढाकारामुळेच सरकार माघारले" असे सांगत आहेत. पण महाराष्ट्राने, देशाने आणि जगाने पाहिले की हा संघर्ष कुण्या पक्षाचा नसून, हा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा आहे.

समाजाचा स्पष्ट संदेश,आज जरांगे पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना, समाजाला एकच संदेश द्यायचा आहे 

*त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवा,

*कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आदर करा,

* आणि कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने या लढ्यावर फुकटचे श्रेय घेऊ नये.

इतिहास लक्षात ठेवेल,मराठा समाजाचे आरक्षण हे राजकीय खेळीमुळे नव्हे, तर समाजाच्या संयम, त्याग आणि आंदोलनामुळे मिळाले आहे. उद्या जेव्हा या लढ्याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्या इतिहासात श्रेय कुणा पक्षाचे नसेल; ते श्रेय फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे असेल.

मराठा आरक्षणाचा लढा हा सहजासहजी मिळालेला नाही, तर त्यासाठी मराठा समाजातील हजारो कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी प्राणपणाने लढा दिला आहे. उपोषण, निदर्शने, आंदोलने, रात्रंदिवस पावसात चिंब भिजत कार्यकर्त्यांनी दिलेला साथ आणि जरांगे पाटील यांचे नेतृत्व हे या लढ्याचे केंद्रबिंदू ठरले आहे.

महाराष्ट्रासोबतच देशभर आणि जगभर या संघर्षाने लक्ष वेधून घेतले. मुंबईच्या रस्त्यांवर हजारो कार्यकर्ते ताटकळत उभे राहिले, अनेकांनी उपाशीपोटी दिवस काढले, तर काहींनी आरक्षणासाठी आपला जीव पणाला लावला. हा संघर्ष फक्त राजकीय नसून सामाजिक चळवळ ठरली.

पण, आज जेव्हा आरक्षणाच्या प्रश्नावर काही सकारात्मक घडामोडी दिसू लागल्या, तेव्हा विविध राजकीय पक्ष आणि नेते यावर आपापले राजकारण करू लागले आहेत. श्रेयासाठीची ही चढाओढ समाजाला अस्वस्थ करणारी आहे. कारण, मराठा समाजाला मिळणाऱ्या या न्यायासाठी सर्वांत मोठा त्याग जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

जरांगे पाटील यांनी स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता, मराठा समाजाच्या भविष्यासाठी रात्रंदिवस संघर्ष केला. त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी पावसात, उन्हात, कधी भुकेल्या पोटी तर कधी उघड्यावर झोपून या चळवळीला साथ दिली. महाराष्ट्रातील गावागावातून युवक, शेतकरी, महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

आज परिस्थिती अशी आहे की, राजकीय नेते या चळवळीवर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण "हे आमच्या पक्षाच्या दबावामुळे घडले" असे सांगत आहेत, तर काही थेट "आमच्या पुढाकारामुळे समाजाला आरक्षण मिळाले" अशी भूमिका घेत आहेत. पण हा इतिहास खोटा ठरणार नाही – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या संघर्षाचे खरे शिल्पकार म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्तेच आहेत.

ही चळवळ ही केवळ मराठ्यांची नव्हे तर न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक समाजाच्या संघर्षाचे उदाहरण ठरली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी या प्रश्नावर श्रेयवाद न करता, खऱ्या त्यागाची आणि मेहनतीची दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा, समाज पुन्हा एकदा राजकारण्यांविषयी भ्रमनिरास पावेल.

आज महाराष्ट्रासोबतच देशभरात जरांगे पाटील यांच्या लढ्याचे कौतुक होत आहे. जगाने पाहिले की, एका समाजाने आपला नेता सोबत घेऊन कसा अहिंसक पण ठाम लढा उभारला. त्यामुळे राजकीय पक्षांनी फुकटचे श्रेय घेण्यापेक्षा या समाजातील कार्यकर्त्यांना आणि जरांगे पाटील यांना दाद द्यावी, हा समाजाचा स्पष्ट संदेश आहे.