गणपती विसर्जनाच्या वेळी 'ह्युमन बॉम्ब'ची धमकी, पोलिसांनी सुरू केला तपास..!
मुंबईत धमकीचा खळबळजनक संदेश, पोलिसांनी वाढवला सुरक्षा बंदोबस्त
05 September, 2025
मुंबई (जरंडेश्वर समाचार):-मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना 'ह्युमन बॉम्ब'ची धमकी मिळाली आहे. एका निनावी संघटनेकडून 'लष्कर-ए-जिहादी' नावाच्या दहशतवादी गटाने ३४ गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याची आणि शहरात भीती निर्माण करण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, शहरातील संवेदनशील ठिकाणी तपासणी वाढवली आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबईत मोठी गर्दी होणार आहे, त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे सांगितले आहे.