single-post

सोनके येथे बुद्ध विहाराच्या जागेवरून वाद |;आजाद समाज पक्षाने केला जाहीर निषेध

डी वाय एस पी अजित टक्के यांनी गावाला भेट दिली शांततेचे आव्हान केले

31 August, 2025

सोनके येथे बुद्ध विहाराच्या जागेवरून वाद;आजाद समाज पक्षाने केला जाहीर निषेध

सातारा (जरंडेश्वर समाचार सेवा) : कोरेगाव तालुक्यातील सोनके गावात प्रस्तावित बुद्ध विहाराच्या जागेवरून  वाद निर्माण झाला आहे. या ठिकाणी काम सुरू असताना गावातील सुमारे ५०० लोकांनी एकत्र येऊन बौद्ध अनुयायांना दहशत दाखवत काम थांबवले, अशी माहिती स्थानिक स्तरावर मिळाली आहे. या घटनेमुळे बौद्ध बांधवांमध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आजाद समाज पक्षाचे   जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.  आजाद समाज पक्षाचा प्रतिनिधीमंडळाने सोनके गावातील बौद्ध वस्तीला भेट देऊन पीडित अनुयायांना धीर दिला.

प्रतिनिधीमंडळाने पीडित बांधवांशी संवाद साधून, “धर्मस्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून कोणत्याही समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही” असे स्पष्ट मत तुषार मोतलिंग यांनी केले आहे.

  पक्षाच्या प्रतिनिधींनी DYSP अजित टिके यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत तक्रार नोंदवली. डी वाय एस पी अजित टीके यांनी गावात शांतता राखावी चांगली वातावरण ठेवा, वाद-विवाद टाळा, सामंजसने प्रश्न सोडवा, कायदा कोणीही हातात घेऊ नये अन्यथा कारवाई करावी लागेल , गावात शांतता राखा असे आव्हान डीवायएसपी अजित टिके यांनी केले आहे.

द्ध समाजावर दहशत माजवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावे, कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच बुद्ध विहाराच्या जागेवरील काम निर्विघ्नपणे सुरू राहावे,

अशा मागण्या आजाद समाज पक्षाने व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अधिकारी यांना केले आहे ‌

 , “जगाला युद्ध नको, बुद्ध हवा हा संदेश देणाऱ्या या समाजाला जर सतत दडपणाखाली ठेवले गेले तर त्याचा निषेध केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. गरज पडल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल.”असा इशारा समाज बांधवांनी दिला आहे

या घटनेमुळे सोनके गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, स्थानिक बौद्ध समाज बांधवांनी एकमुखाने सांगितले की, “बुद्ध विहार उभारणे हा आमचा आध्यात्मिक व सांस्कृतिक हक्क आहे; तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.”