“बावधनच्या काळभैरवनाथ मंदिराला नवी ऊर्जा – ग्रामस्थांच्या सहभागातून जर्णोद्धाराचा प्रारंभ”
उद्घाटन व भूमिपूजन — गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ
28 August, 2025
“बावधनच्या काळभैरवनाथ मंदिराला नवी ऊर्जा – ग्रामस्थांच्या सहभागातून जर्णोद्धाराचा प्रारंभ”
उद्घाटन व भूमिपूजन — गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ
बावधन दि.२८ (जरंडेश्वर समाचार): गणेश चतुर्थीच्या मंगलमयी मुहूर्तावर सातारा जिल्ह्यातील बावधन गावातील प्राचीन काळभैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
सोनजाई डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या मंदिराचे नूतनीकरण केवळ एक धार्मिक कार्य नसून, गावातील लोकांच्या एकजुटीचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनले आहे. या सोहळ्याला हजारो ग्रामस्थांनी उपस्थिती लावून त्यांच्या सामूहिक भावनेची आणि मंदिराविषयीच्या आत्मीयतेची साक्ष दिली.
या मंदिराच्या जीर्णोद्धाराची सर्वात खास गोष्ट म्हणजे, कोणत्याही सरकारी निधीशिवाय केवळ ग्रामस्थांच्या योगदानातून हे कार्य हाती घेण्यात आले आहे. मंदिराच्या मूळ पायऱ्या, गाभारा आणि इतर ऐतिहासिक संरचनांना धक्का न लावता नूतनीकरण केले जाणार आहे, ज्यामुळे मंदिराचे प्राचीनत्व कायम राहील. हे काम पूर्ण झाल्यावर मंदिराला एक आधुनिक आणि आकर्षक रूप मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
बावधन येथील सुप्रसिद्ध बगाड यात्रा सहा महिन्यांवर आली असून, ग्रामस्थांनी आतापासूनच तिची तयारी सुरू केली आहे. काळभैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या बैठकीतच यात्रे पूर्वी मंदिर पूर्ण करण्याचे ठरले आहे. या बैठकीला पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामूहिक प्रयत्नांमुळे बावधन गावची एकी आणि सांस्कृतिक ओळख शिव काळापासून दिसून येत आहे.
हा जीर्णोद्धार म्हणजे केवळ एका वास्तूची डागडुजी नसून, तो बावधनच्या ग्रामस्थांचा उत्सव, त्यांचे मंदिराशी असलेले भावनिक नाते आणि सामूहिक जाणिवेचा संगम आहे. या उपक्रमातून सामाजिक एकता आणि सामूहिक जबाबदारीची भावना दिसून येते. प्रत्येकजण आपापल्या परीने आर्थिक आणि शारीरिक मदत देत असून, हे कार्य गावासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी रोख रक्कम रुपये गोळा केले आणि काही मान्यवरांनी रोख रक्कम जाहीर केल्या ती रक्कम यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्याकडे देण्यात आली आहे ग्रामस्थ मंडळी सढळ हाताने या मंदिराच्या कार्यासाठी मदत करत आहेत .