single-post

ह.भ.प. संत कै. बाबुराव दादा वारे महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली

: ह.भ.प. संत कै. बाबुराव दादा वारे महाराज हे बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे यांचे वडील आहेत.

22 August, 2025

ह.भ.प. संत कै. बाबुराव दादा वारे महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

सांगली दि.२२(जरंडेश्वर समाचार) : ह.भ.प. संत कै. बाबुराव दादा वारे महाराज (वय ९४, रा. मौजे बिळाशी, ता. शिराळा) यांचे शुक्रवारी सकाळी सहा वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व हरपले आहे.

महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्य आणि अध्यात्मासाठी समर्पित केले होते. त्यांच्या प्रवचन आणि कीर्तनातून असंख्य भाविकांना धर्ममार्गाची दिशा मिळाली.

या दुःखद प्रसंगी बार्टीचे महासंचालक  तसेच आर्टीचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. सुनील वारे साहेब यांच्या दुःखात अनेकजण सहभागी झाले आहेत. वारे कुटुंबियांना धैर्य लाभो, महाराजांच्या आत्म्यास शांती लाभो अशा भावना व्यक्त होत आहेत.

महाराजांचा अंत्यविधी शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजता मौजे बिळाशी, ता. शिराळा, जि. सांगली येथे होणार आहे.