single-post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने समाजसेवकांचा गौरव

अण्णाभाऊंना 'भारतरत्न' देण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांशी बोलणार - आचार्य राकेश कुमार

25 August, 2025

सोमवार, दि. २५ ऑगस्ट, २०२५

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने समाजसेवकांचा गौरव

वाई दि.२५दिलीप कांबळे यांच्या कडून (जरंडेश्वर समाचार ) : वाई येथील टिळक ग्रंथालयात समता नम्रता विविधता विकास मंच या संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट, आचार्य राकेश कुमार, जयसिंग पवार आणि काशिनाथ गायकवाड यांच्या हस्ते हे पुरस्काप्रदान करण्यात आले.

​यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव जगताप, आरपीआय नेते स्वप्निलभाई गायकवाड, डॉ. शेखर कांबळे, टायगर ग्रुपचे प्रशांत सातपुते, अजित भोरे, डॉ. विठ्ठल भोईटे, सुनीता जाधव, प्रा. सरिता वैराट, मनोहर देगावकर, किशोर भगत, सागर शिंदे, नितीन वैराट, अशोक देवकुळे, ऋषिकेश वायदंडे आणि संतोष फडतरे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

​कार्यक्रमात बोलताना भगवानराव वैराट म्हणाले की, समता नम्रता विविधता विकास मंचचे कार्य प्रशंसनीय असून, योग्य समाजसेवकांची निवड करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रेरणेतून समाजात जागृती निर्माण होईल. आचार्य राकेश कुमार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने पुरस्कार देण्याच्या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न' मिळावा यासाठी आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, संस्थेला भरीव मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

​यावेळी दत्ता दादर, डॉ. शेखर कांबळे, जयसिंग पवार आणि कृष्णा कांबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सकटे यांनी केले, तर सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी केले. अशोक येवले यांनी आभार मानले.

​या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, सुरेखा भालेराव, महंमद शेख, सनीभाई ननावरे, प्रवीण संकपाळ, सचिन वायदंडे, संतोष बाबर, जॉन जोसेफ, आशिष भोसले, प्रमोद भिसे, करण साठे, सागर पवार, आरती कांबळे, सुनील भिसे, डॉ. बिपीन वैराट, कांचन बाबर, वृषाली कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.