single-post

कोरेगाव न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी आमदार शशिकांत शिंदेंचा निधी – वकील बांधवांत उत्साहाचे वातावरण

न्यायालय हे न्यायदानाचे मंदिर, त्याची देखभाल आवश्यक;

21 August, 2025

कोरेगाव दि.(जरंडेश्वर समाचार): न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी विकास निधी उपलब्ध करून दिला असून वकील बांधवांना आवश्यक सुविधा पुरवता आल्या, याचा मला मनस्वी आनंद आहे. वकील संघटनेच्या प्रत्येक उपक्रमाला मी कायम साथ देईन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष, माजी जलसंपदा व पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

अलीकडेच कोरेगाव दिवाणी न्यायालयाची नवी इमारत कार्यान्वित झाली असून त्या इमारतीची पाहणी करण्यासाठी आमदार शिंदे खास उपस्थित राहिले. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्याबद्दल कोरेगाव बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.

निधीची आश्वासने पूर्णत्वास,नूतन न्यायालयीन इमारतीत वकिलांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था असलेला हॉल उभारण्याची आणि आधुनिक ई-लायब्ररीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार शिंदे यांनी पूर्वी दिली होती. त्या आश्वासनांची प्रत्यक्ष पूर्तता झाल्याने वकील बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे.

"न्यायालयाची इमारत ही केवळ वास्तू नसून न्यायदानाचा पवित्र मंदिर आहे. त्याच्या देखभालीकडे योग्य लक्ष द्यावे," असे मार्गदर्शन शिंदे यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ विधिज्ञांचे मनोगत,या कार्यक्रमात ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. श्रीकांत केंजळे व अॅड. तानाजीराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अमोल भूतकर, उपाध्यक्ष अॅड. निलेश झांजुर्णे, सचिव अॅड. रणजित भोसले व खजिनदार अॅड. प्रतीक फाळके यांनी आमदार शिंदे यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

विशेष गौरव,यावेळी कोरेगाव बारचे माजी अध्यक्ष अॅड. अनिल फाळके यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कारण अलीकडेच सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सातारा जिल्हा बार असोसिएशनने प्रथम क्रमांक पटकावला असून या विजयी टीममध्ये अॅड. फाळके यांनी खेळाडू म्हणून सहभाग घेतला होता.

मान्यवरांची उपस्थिती ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. रणजित भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. गायत्री भूतकर यांनी केले.

या कार्यक्रमाला अॅड. अशोककुमार वाघ, अॅड. पांडुरंग भोसले, अॅड. संदीप चव्हाण, अॅड. अधिराज माने, अॅड. अभिजीत केंजळे, अॅड. सतीश कदम, अॅड. भैय्यासाहेब जगदाळे, अॅड. धैर्यशील घारगे, अॅड. महेश शेडगे, अॅड. एस.एस. साखरे, अॅड. इरफान जमादार, अॅड. मृदुला बारसवडे, अॅड. गायत्री भुतकर, अॅड. तृप्ती भोसले, अॅड. अपूर्वा बर्गे, अॅड. नीता घाडगे, अॅड. अंजली पाटोळे, अॅड. अक्षदा देशमाने, अॅड. रुपाली बर्गे, अॅड. श्रेया साळुंखे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या कोरेगाव बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी, वकिल बांधव व मान्यवरांचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मनःपूर्वक आभार मानले.

“आपण दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग व एकजुटीमुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. न्यायालयीन इमारतीच्या विकासकामांसाठी दिलेला निधी हा तुमच्या विश्वासाला उतराई करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. या पुढेही आपण सर्वांनी सोबत राहावे, हीच अपेक्षा,” असे शिंदे यांनी सांगितले.