single-post

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही – मंत्री मकरंद पाटील

यशवंतनगरात अंगणवाडी, घंटागाडी, वॉटर एटीएमचे लोकार्पण"

21 August, 2025

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही – मंत्री मकरंद पाटील

यशवंतनगर ,ता. वाई, दि. 21(जरंडेश्वर समाचार): “प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या मागे भक्कम पाठबळ उभे केले आहे. त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमच्या भागातील आवश्यक विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही,” असा शब्द मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिला.

यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी इमारत, घंटागाडी, वॉटर एटीएम यांसह विविध विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव पवार, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, किसनवीर कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सरपंच मेघा सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री मकरंद पाटील म्हणाले, “शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर आणि यशवंतराव चव्हाण व किसन वीरांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या मार्गावर राज्य सरकार कार्यरत आहे. गोरगरीब, कष्टकरी, वंचितांसाठी सातत्याने काम सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे,” असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास मदन भोसले, शामराव शिंदे, विक्रांत डोंगरे, अनिल सावंत, नारायण जाधव, सचिन सावंत, बाळासाहेब चिरगुटे, चंद्रकांत सावंत, डॉ. भोसले, सुनील सावंत, सुनील शिंगटे, सुरेश सावंत, सदाभाऊ कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले तर आभार उपसरपंच शामराव गाडे यांनी