धोम धरणातून ८७०० क्युसेकनं विसर्ग; कृष्णा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा; प्रशासनानं दिल्या सूचना
वाई शहरात ऐतिहासिक गणपती मंदिरात पाणी शिरलं
19 August, 2025
वाई दि.१९(जरंडेश्वर समाचार): वाई तालुक्यातल्या धोम धरणात पावसामुळे साठा झपाट्यानं वाढल्यानं आज धरण प्रशासनानं पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाचे तब्बल पाच दरवाजे उघडून ८७०० क्युसेकनं पाणी सोडलं. त्यामुळे कृष्णा नदीला महापूर आलाय.
धरणातून पाणी सुटल्यानं वाई शहरातल्या ऐतिहासिक गणपती मंदिरालाही पाण्यानं वेडा घातला. मंदिरात पाणी शिरल्यानं गणपतीच्या पायाला नदीनं पाळणा स्पर्श केला. हा नजारा पाहायला लोक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. मात्र, प्रशासनानं गर्दी करू नका, सुरक्षिततेला प्राधान्य द्या असं वारंवार आवाहन केलंय.
धरणातून पाणी सुटल्यामुळे कृष्णा काठावरील वाई, मेहुणघर, पळशी आदी गावांमधल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवा, नदीकाठ टाळा, मुलाबाळांना पाण्याजवळ जाऊ देऊ नका, अशा सूचना देण्यात आल्यात.
सध्या धोम धरण ९० टक्क्यांवर भरलाय, त्यामुळे पुढं पावसाचा जोर कायम राहिला तर विसर्ग अजून वाढवला जाईल, अशी शक्यता धरण अधिकाऱ्यांनी वर्तवलीये आहे. काळजी घ्या सुरक्षित रहा. असे आव्हान करण्यात येत आहे.