single-post

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी

बुधवार दि. २० ,२१ ऑगस्ट रोजी पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड या तालुक्यातील सर्व शाळा बंद राहती

19 August, 2025

सातारा  दि.१९ ( जरंडेश्वर समाचार):-हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा यांच्या सूचनेनुसार जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी यांनी आदेश जारी करून काही तालुक्यातील शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे निर्देश देणयात आले आहेत.

दि.२० व २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड या तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत.

उर्वरित जे तालुके आहेत, कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यांमध्ये पर्जन्यमान व परिस्थिती लक्षात घेऊन शाळा बंद ठेवायच्या की नाही, याबाबतचा निर्णय संबंधित तालुक्यातील पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी यांना अधिकार देण्यात आले आहेत.

शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी दक्षता घ्यावी, असेही आवाहन जिल्हा परिषदे कडून करण्यात आले आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी राहिलेले शैक्षणिक काम रविवारी घेऊन पूर्ण करावे व त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.