सांगलीत महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लीम अधिकार परिषद
राज्यातील पहिलीच ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषद
18 August, 2025
सांगलीत महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लीम अधिकार परिषदेचा भव्य कार्यक्रम परिषद
सांगली | प्रतिनिधी(जरंडेश्वर समाचार):- महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लीम अधिकार परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यक्रम शनिवार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:४५ वाजता सांगलीतील भावे नाट्यगृहात पार पडणार आहे.
या सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. आ. जयंत पाटील साहेब असतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन नायक प्रा.सुकुमार कांबळेसर हे भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. अजिंक्य चांदणे तर प्रमुख जातीय मान्यवर म्हणून मा. विकास मणदम , मा. मनोहर रणधीर व मा. पॉवलोस पवार उपस्थित राहणार आहेत.
तसेच कार्यक्रमाला मा. अब्राहम आवळे, मा. असिफ नवीलाल थापा, मा. श्रीनिवास चोपडे, मा. राम कांवडे, मा. पॉल चाको यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेच्या माध्यमातून समाजातील ख्रिश्चन व मुस्लिम समाजाच्या अधिकार, प्रगती व एकात्मतेसाठी प्रयत्नशील भूमिका मांडली जाणार आहे. मा. हाफीज मोहमद अली , रेव्ह. मनोज काटे यांचे विशेष मार्गदर्शन या परिषदेस लाभणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक मा. ग्रॅब्रेल तिवडे असून, मा. दादासाहेब कन्नूर यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे.
या कार्यक्रमाद्वारे समाजातील ऐक्य, सौहार्द व अधिकारांच्या जाणीवा दृढ करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.