शहीद जवान प्रविण वायदंडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना प्रविण वायदंडे यांना वीरमरण आले
17 August, 2025
शहीद जवान प्रविण वायदंडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोरेगाव दि.१७(जरंडेश्वर समाचार):-कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे गावचा सुपुत्र व देशाचा अभिमान असलेले शहीद हवालदार प्रविण अंकुश वायदंडे यांच्यावर रविवार दि.१७ ऑगस्ट 2025 रोजी दुपारी मूळगावी शासकीय पार्थिवावर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.
कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे गावचे सुपुत्र प्रवीण अंकुश वायदंडे हे महार रेजिमेंट २२ इन्फंट्री ब्रिगेड मध्ये हवलादार पदावर कार्यरत होते.
शहीद जवानांचे पार्थिव लष्कराच्या ताफ्यातून सासुर्वे गावात आणण्यात आले. त्यावेळी गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी, तसेच उपस्थित नागरिकांनी "भारत माता की जय", "शहीद जवान अमर रहे" या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून टाकले.
अंत्यसंस्कारावेळी लष्करी पथकाकडून सलामी देऊन त्यांना वीनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले. शहीद जवानांचा अंत्ययात्रा मार्ग फुलांच्या वर्षावाने दुमदुमून गेला होता.
शहीद वायदंडे यांच्या बलिदानाने गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे मस्तक उंचावले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असली तरीही, गावकऱ्यांना व कुटुंबीयांना अभिमानाची जाणीव आहे की त्यांचा लाडका सुपुत्र, देशरक्षणाच्या कामी आला .
"शहीद जवान प्रविण वायदंडे अमर रहे" अशा घोषणांत त्यांच्या अंत्यसंस्काराचा माहोल देशभक्तीने भारून गेला होता.
आयुष्यावर दुःखाचे सावट पसरले आहे.