single-post

निवडणुकीत ‘ईव्हीएम’ऐवजी बॅलेट पेपर वापरा; सिटिझन कॉन्फरन्सची मागणी”

विधानसभा निवडणूक पारदर्शक व्हावी; सिटिझन कॉन्फरन्स साताऱ्याची ठाम मागणी”- शिवाजी राऊत/अस्लम तडसकर

19 August, 2025

विधानसभा निवडणूक पारदर्शक व्हावी : ऑल इंडिया सिटीझन कॉन्फरन्स साताऱ्याची मागणी

सातारा(जरंडेश्वर समाचार): आगामी विधानसभा निवडणूक २०२४ पारदर्शक, निर्भय आणि मतदारांचा विश्वास राखणारी व्हावी, यासाठी ऑल इंडिया सिटीझन कॉन्फरन्स साताराने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर केले आहे.

या निवेदनावर शिवाजी राऊत व अस्लम तडसकर यांच्या स्वाक्षऱ्या असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी काही ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.

प्रमुख मागण्या

विधानसभा निवडणुकीतील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचे कामकाज तपासून, अनियमिततेत सहभागी अधिकाऱ्यांना दूर करावे.

मतमोजणी प्रक्रियेत पोस्टल मतांची मोजणी प्रथम व्हावी.

फॉर्म १७C व ७C चे अनुपालन करून त्याचे सार्वजनिक प्रकटीकरण करावे.

२०१८-१९ मधील निवडणुकीच्या खर्चाबाबत महालेखाकारांच्या आक्षेपांची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा खर्च पारदर्शकपणे जनतेसमोर जाहीर करावा.

मागणीचे कारण

संस्थेने लोकप्रतिनिधी कायदा १९५२ चा दाखला देत, सामान्य मतदारांना बॅलेट पेपरद्वारे मतदानाचा हक्क आहे, असे नमूद केले. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या अधिकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

“मतदारांचा विश्वास जपणारी व कायद्याचे पालन करणारी विधानसभा निवडणूक व्हावी, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे,” असा ठाम सूर ऑल इंडिया सिटीझन कॉन्फरन्स साताऱ्याने या निवेदनातून व्यक्त केला आहे