छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची : यशस्वी गरुडभरारी
सुरक्षित गुंतवणूक – सुलभ कर्जवाटप – सामाजिक बांधिलकी” या त्रिसूत्रीवर आधारलेली ही पतसंस्था महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील एक दीपस्तंभ आहे.
16 August, 2025
छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची : यशस्वी गरुडभरारी..!
-(सुरेश बोतालजी संपादक जरंडेश्वर समाचार)
पिंपोडे बु. (ता. कोरेगाव, जि. सातारा) या छोट्या ग्रामीण भागातून सुरू झालेली छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था आज महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था ठरली आहे. १९८९ साली केवळ ४० हजार रुपयांच्या भांडवलावर व 'विणा सहकार सही उधार' या विचारावर आधारित सुरू झालेली ही पतसंस्था आज तब्बल 1500 कोटी रुपयांच्या आसपास संमिश्र व्यवसायावर झेपावली आहे.
छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची सुरुवात आणि हेतू-कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, सावकारीचे जोखड आणि शेतकऱ्यांची बिकट आर्थिक अडचण दूर करण्यासाठी श्री. रामभाऊ लेंभे, संस्थापक छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था तसेच सुरेशराव साळुंखे आणि अशोकराव लेंभे या संस्थापक मंडळींनी संस्थेची स्थापना केली.
शेतकऱ्यांना सावकारकीतून मुक्त करणे,गरीब व मध्यमवर्गीयांना कर्जपुरवठा करणे,बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनवणे,महिला सबलीकरणाला चालना देणे,बचतीची सवय लावणे,हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पतसंस्था कार्यरत झाली.
वाटचालीचा प्रवास-सुरुवातीला १०१ महिलांच्या खात्यांपासून सुरू झालेला प्रवास आज ७८ हजाराहून अधिक सभासदांपर्यंत पोहोचला आहे.
भागभांडवल: २८ कोटी २५ लाख,ठेवी: ७९८ कोटी २९ लाख,कर्जवाटप: ६८० कोटी ८४ लाख, गुंतवणूक: २२० कोटी ६६ लाख,संमिश्र व्यवसाय: १४८६ कोटी १३ लाख, आसपास आहे. ही आकडेवारी संस्थेच्या भक्कम पाया आणि जनविश्वासाची साक्ष देणारी आहे.आधुनिक तंत्रज्ञानाची जोड,बँकांसारख्याच सुविधा देत पतसंस्थेने ग्राहकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत केला आहे.स्वतःचे मोबाईल अॅप व मोबाईल बँकिंग,आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, युपीआय, क्यूआर कोड सुविधा,एसएमएस बँकिंग, पिग्मी अॅप,बायोमेट्रिक प्रणाली व व्हिडिओ कॉन्फरन्स,सीबीएस प्रणालीद्वारे सर्व शाखा संगणकीकृत,सभासद हितासाठी उपक्रम,संस्थेने ग्राहक व सभासदांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या जीवनमान उन्नतीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.१००% सुरक्षित ठेवी व गुंतवणूक,अपघाती विमा संरक्षण (सभासदांना ₹२५,००० व कर्जदारांना ₹२ लाखांपर्यंत),स्वयं सुरक्षा ठेव योजनेतून ₹५०,००० अपघात विमा,सेवक व कुटुंबीयांसाठी मेडिकल आधी योजना,जेष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर, ५ मिनिटांत सोनेतारण कर्ज सुविधा.
महिला सबलीकरण-‘दुर्बलं त्रायते नित्यम्’ या बोधवाक्यानुसार महिलांना सूक्ष्म कर्ज (मायक्रो फायनान्स) उपलब्ध करून दिले गेले. आतापर्यंत ६४६२ महिलांना १७ कोटी ५२ लाखांचे कर्ज देऊन अनेकांना स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला. विशेष म्हणजे महिला कर्जवाटपात थकबाकी शून्य आहे.
सामाजिक बांधिलकी- संस्थेने १५ अडचणीत सापडलेल्या पतसंस्थांचे विलिनीकरण करून ठेवीदारांना दिलासा दिला. ग्राहकांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करणारी राज्यातील ही एकमेव संस्था ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय मान्यता- २०१४ मध्ये ISO 9001 : 2008 प्रमाणपत्र मिळवून संस्थेने गुणवत्ता आणि दर्जाचा ठसा उमटवला.
छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था ही केवळ एक पतसंस्था नाही, तर ग्रामीण व शहरी जनतेच्या आर्थिक उन्नतीची एक सक्षम बँकच ठरली आहे. ग्राहकांचा विश्वास, संचालक मंडळाची दूरदृष्टी, सेवकांचा कष्टाळू वृत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे संस्थेने यशस्वी गरुडभरारी घेतली आहे.
“सुरक्षित गुंतवणूक – सुलभ कर्जवाटप – सामाजिक बांधिलकी” या त्रिसूत्रीवर आधारलेली ही पतसंस्था महाराष्ट्रातील सहकार चळवळीत एक दीपस्तंभ बनली आहे.
-सुरेश बोतालजी संपादक जरंडेश्वर समाचार मो-९११२६५०६५०