कोरेगाव शहराला हवे आधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल-सुरेश बोतालजी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार
कोरेगाव शहरातील हॉस्पिटल मध्ये गंभीर आजारावर उपचार मिळत नसल्यामुळे शहरांमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उभरावे
13 August, 2025
कोरेगाव दि.१७(जरंडेश्वर समाचार):-कोरेगाव येथे आधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना यांना ऑगस्ट महिन्यात निवेदन सादर करणार असून अजित दादा पवार महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री यांच्याकडून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा वाढणार आहेत.अजितदादा यांनी लक्ष घालून हे हॉस्पिटल तात्काळ उभे करण्यासाठी लवकर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सुरेश बोतालजी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी केली आहे.
कोरेगाव तालुक्यात सुमारे ३ लाख १५ हजार लोकसंख्या असून, संपूर्ण तालुक्यात फक्त उपजिल्हा रुग्णालय व काही खाजगी रुग्णालयांद्वारेच आरोग्यसेवा दिली जाते. गंभीर आजार, अपघात, हृदयविकार, मेंदूविकार, कॅन्सर, डायलिसिस किंवा मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना ३०–१२० किमी अंतरावरील सातारा, कराड, पुणे किंवा कोल्हापूर येथे जावे लागते.
गेल्या वर्षातील आकडेवारी:
अपघाती जखमी रुग्ण: १,२५० (यापैकी ३५% रुग्णांना बाहेर हलवावे लागले)
हृदयविकार व मेंदूविकार रुग्ण: ९८० (यापैकी ५०% रुग्ण पुणे येथे हलवले गेले)
डायलिसिस आवश्यक असणारे रुग्ण: ११० (साप्ताहिक प्रवास खर्च व त्रास जास्त)
मातामृत्यू/शिशुमृत्यू प्रकरणे: १२ (मुख्य कारण – वेळेवर सुविधा न मिळणे)
कोरेगाव व परिसरातील लोकसंख्या, रुग्णसंख्या व आरोग्य सुविधांची निकड पाहता येथे आधुनिक सुविधा असलेले १००-१५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे अत्यावश्यक आहे. हृदयविकार व मेंदूविकार विभाग,कॅन्सर निदान व उपचार विभाग,हाडांचे शस्त्रक्रिया विभाग,
बालरोग व प्रसूती विभाग,डायलिसिस केंद्र,
अपघात व आपत्कालीन विभाग (२४ तास), आदी विविध विभागांचा समावेश करण्यात यावा.
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी या मागणीचा गांभीर्याने दखल घेऊन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक निधी मंजूर करून कोरेगाव येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी तातडीने उभारावे अशी मागणी करणार आहे,
या मागण्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी कराल अशी आपणाकडून अपेक्षा! या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चा खटाव ,कोरेगाव , सातारा, या तालुक्यातील जनतेला चांगला फायदा होईल रुग्णांचे हाल थांबतील ,आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनता.