कोरेगावच्या आरोग्यसेवेला नवी दिशा 50 बेडचे ट्रॉमा सेंटर उभारणार,-आमदार महेश शिंदे यांची ऐतिहासिक घोषणा
कोरेगावच्या आरोग्य सेवेत ऐतिहासिक पाऊल – 50 बेडचे ट्रॉमा सेंटर दोन वर्षांत पूर्ण होणार .;सुरेश बोतालजींच्या निवेदनाला यश – आमदार महेश शिंदेंनी दिला जनतेला शब्द
15 August, 2025
कोरेगाव, 15 ऑगस्ट (प्रतिनिधी जरंडेश्वर समाचार) –"आरोग्य सेवेशिवाय विकास अपूर्ण आहे" — हा विश्वास कृतीत उतरवत कोरेगाव शहराला आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक मोठी भेट मिळाली. 50 बेडचे आधुनिक ट्रॉमा सेंटर पुढील दोन वर्षांत उभारले जाईल, अशी ऐतिहासिक घोषणा लोकप्रिय आमदार महेश शिंदे यांनी आज प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात केली.
ही घोषणा होताच उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कारण, अपघात, हृदयविकार किंवा गंभीर आजार असताना रुग्णांना 100 किमी दूर शहरात नेण्याची वेळ कोरेगावकरांवर वारंवार येत होती. कित्येक जण या प्रवासात प्राण गमावत होते. आता या ट्रॉमा सेंटरमुळे तो काळ संपणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी कोरेगावच्या आरोग्य समस्यांवर लक्ष वेधत आमदारांना निवेदन दिले होते. “हे निवेदन माझ्या हातात आले आणि मला समजलं – ही केवळ मागणी नाही, तर जनतेची तातडीची गरज आहे,” असं सांगत आमदार शिंदे यांनी त्वरित हिरवा कंदील दाखवला.
रामोशी वाडीकडून भाडळे गावाकडे जाणारे पाणी आणि कोरेगाव उत्तर चार भाग हा सिंचनाखाली असेल बारा महिने पाणी आपल्याला मिळेल हे आपले स्वप्न पूर्ण होईल असा आशावाद आमदार महेश शिंदे यांन व्यक्त केला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिक्षणामध्ये मोठी क्रांती होत असून स्मार्ट स्कूलच्या माध्यमातून सुंदर अशी इमारत बांधलेले आहेत ,एक चांगले दर्जेदार शिक्षण या माध्यमातून नवीन पिढीला मिळेल .
आरोग्यसेवेची निकड
3 लाख 15 हजार लोकसंख्या असून फक्त उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून
1,250 अपघातग्रस्त रुग्ण (35% बाहेर हलवावे लागले)
980 हृदयविकार व मेंदूविकार रुग्ण (अर्ध्याहून अधिक पुण्यात उपचारासाठी)
110 डायलिसिस रुग्ण – आठवड्याला प्रवासाचा त्रास
12 मातामृत्यू/शिशुमृत्यू प्रकरणे – विलंबित उपचार हे मुख्य कारण
नवीन ट्रॉमा सेंटरमध्ये हृदयविकार व मेंदूविकार उपचार, कॅन्सर निदान, हाडांच्या शस्त्रक्रिया, बालरोग-प्रसूती विभाग, डायलिसिस केंद्र आणि 24 तास कार्यरत आपत्कालीन विभाग असणार आहेत.
शब्द पाळणारा आमदार – कोरेगावच्या जनतेसाठी जीवनदायिनी भेट" आज 15 ऑगस्ट रोजी कोरेगाव प्रांत कार्यालयात मी आमदार महेश शिंदे साहेबांना कोरेगाव शहरात ट्रॉमा सेंटर उभारण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. कामानिमित्त मी तेथून बाहेर पडलो, परंतु काही क्षणांनीच आमदार साहेबांनी आपल्या भाषणात कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयाशेजारी 50 बेडचे आधुनिक ट्रॉमा सेंटर उभारण्याची घोषणा केली.माझ्या पत्रकारितेच्या आणि सामाजिक कार्याच्या कारकिर्दीत प्रथमच असा आमदार पाहिला, ज्यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेतली आणि विलंब न लावता जनतेसमोर कामाची घोषणा केली.गंभीर आजार, अपघातग्रस्त रुग्ण आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हे ट्रॉमा सेंटर जीवनदायिनी ठरेल. दोन वर्षांत उभारणी पूर्ण होईल हे जाहीर करून आमदार साहेबांनी दिलेला शब्द पाळण्याची परंपरा जिवंत ठेवली आहे. मी कोरेगाव शहर व परिसरातील जनतेच्या वतीने आमदार महेश शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो. ????
- सुरेश बोतालजी संपादक, साप्ताहिक जरंडेश्वर समाचार ,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार
विकासाची नवी पायरी
कोरेगाव पुसेगाव रस्ता, तसेच वाठार स्टेशन ते कोरेगाव हा रस्ता सुद्धा लवकर पूर्ण केला जाईल.भाजी मंडई, सर्किट हाऊस, तिळगंगा नदी विकास यांसारख्या प्रकल्पांनी कोरेगावचा चेहरा बदलणारे आमदार शिंदे आता आरोग्यसेवेत क्रांती घडवण्यास सज्ज आहेत. “हे केवळ हॉस्पिटल नाही, तर कोरेगावकरांसाठी जीवनदान देणारा आधारस्तंभ असेल,” असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.