single-post

एडवोकेट संदीपदादा उगले पाटील यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश; बुलढाण्यातील राजकारणात उलथापालथ

संदीप दादा उमगले पाटील यांच्या प्रवेशामुळे अजितदादा पवार गटाच्या पक्षाला खिंडार पडले

14 August, 2025

बुलढाणा दि.१4(जरंडेश्वर समाचार) – बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नवा राजकीय कलाटणी देणारी घटना आज घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते अॅड. संदीपदादा उगले पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून, तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहितदादा दामोदर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश पार पडला.उगले पाटील यांच्या प्रवेश मुळे बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला खिंडार पडले आहे.

या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अॅड. उगले पाटील हे बुलढाण्यातील ज्येष्ठ व प्रभावी राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली असून, स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा जनाधार आहे.

प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला असून, पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी अॅड. उगले पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत, जिल्ह्यात संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश वंचित बहुजन आघाडीला मोठा बळ देणारा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.