single-post

साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला ' पूल 'आज ही भक्कम स्थितीत आहे

छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचक्रोशीतील रयतेसाठी बांधलेला पूल आजच्या इंजिनिअरिंग लोकांना अचिंबित करतो

10 August, 2025

प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर"  नावाचे एक गाव आहे. नंतर त्याचे "पार"असे नाव पडले. या पार गावाजवळ छत्रपती शिवाजी महराजानी  त्या पंचक्रोशीतील रयते करीता एक पुल बांधून घेतला होता. आज ही पूल दिमाखात उभा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि या पुलाचे बांधकामाचा नमुना पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त होते. कारण त्या काळामध्ये इंजिनिअर सुद्धा नव्हता पण साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला पूल आज ही मजबूत आहे.आजच्या काळातील  इंजिनिअर  अशा पद्धतीचे बांधकाम करु शकतात  का? अशा  इंजिनिअर लोकांनी शिवकाळात विविध ठिकाणी झालेल्य गडकोट, किल्ले , बांधलेल्या इमारती , भुयारी गटारे, पूल यांना भेटीत दिल्या पाहिजेत याचा अभ्यास केला पाहिजे. 

इंजिनिअरिंग कॉलेज मधील प्राध्यापकांनी अशा प्रकारची इमारत असेल, पूल असतील हे विद्यार्थ्यांना दाखवावे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले इमारती , भुयारे ,पूल यामधून या विद्यार्थ्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळेल . इतिहासामधील या विद्यार्थ्यांना रुची राहील, पुढील काळामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये एक नवीन अविष्कार हे विद्यार्थी नक्की करतील असा पत्रकार म्हणून आम्हाला आशावाद आहे. 

८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.

  कोयना नदी ओलांडण्या साठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा भक्कम दगडी पुल आहे. पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत. त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने  पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम फक्त चुन्यात केलेले आहे. 

     सुमारे साडेतीनशे वर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे. दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही.

पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभार उंचीचा १ फूटी दगडी कठडा आहे. 

   आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांचे १०० वर्षे झाली म्हणुन कौतुक करतो. या पुलाला ३५० बर्षे होऊनही अद्याप एकही तडा गेला नाही अथवा दगडही निसटला नाही. त्याच्या आजच्या काळातले पिढीने विचार करावा त्या काळातील, त्यावेळच्या लोकांनी बांधलेला पूल इंजिनिअरिंग क्षेत्रातला अविष्कार मानावा लागेल.