single-post

बॉक्सिंग स्पर्धेत वाई तालुक्यातील शाळेचे यश

वाई तालुक्यातील स्पर्धकांनी १२ स्वर्ण पदके, ९ रौप्य पदके, ९ कास्यस्पदके मिळवून नेत्र दीपक कामगिरी

10 August, 2025

 वाई दि.१० दिलीप कांबळे (जरंडेश्वर समाचार) : नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्थायी बॉक्सिंग स्पर्धे त सातारा वाई संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या स्पर्धे त महाराष्ट्र राज्यातून साडेतीनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत वाई तालुक्यातील स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १२ स्वर्ण पदके, ९ रौप्य पदके, ९ कास्यस्पदके मिळवून नेत्र दीपक कामगिरी केली.

 ज्ञानदीप स्कूल, सेंट थॉमस स्कूल ,द्रविड हायस्कूल, वाई कन्या शाळा, वाई बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ,वाई जिल्हा परिषद शाळा बावधन आदी शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील सुवर्णपदक खेळाडू शुभ्रा शिंदे, सना शेख, सई धायगुडे, वैष्णवी भोरे, कुमार विविध लेंबे, मोहम्मद अली शेख रु हो तुझं झालं समर्थ जाधव सिद्धार्थ तानाजी कचरे सारंग पडवळ वेदांत भोसले रुद्र पवार शिवम गायकवाड यांनी सुवर्णपदक पटकावले तर रौप्य पदाचे मानकरी उन्नती मोरे, स्वराज्य ढेरे ,अथर्व फाळके ,सत्यम डेरे ,पारस देवकर, राजवीर कोरडे, हर्षवर्धन विटकर, मोहित काळभोर, शिव कचरे हे होते. कास्य पदाचे मानकरी वैष्णवी भोसले, तनिष्का पोफळे, कुबेर ,थोरात ,संभाव यादव ,यांनी पटकावले. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा बावधन पाचवीतील विद्यार्थी सिद्धार्थ तानाजी कचरे याने २५ वजन गट असताना थेट ३२ किलो गटात उतरून सुवर्णपदक पटकावले,

वाई तालुक्यातील नामवंत शाळेची दिवसेंदिवस खेळामध्ये चमकदार कामगिरी पहायला मिळत आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पालकांचे प्रोत्साहन तसेच शाळेमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षकाचे योग्य मार्गदर्शन त्यात शिक्षकांची प्रेरणा व मोलाची साथ लाभल्याने या तिन्ही प्रकारांमध्ये तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी पदके पटकावून तालुक्याचे नाव उंचावले ,सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील,खा.नितिन पाटील , मिलींद पाटील, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ यांनी कौतुक केले.