इस्लामपुरात अण्णाभाऊ साठेचा पुतळा उभारणार -आ. जयंतराव पाटील
राजारामबापू सह. बँकेच्या माध्यमातून उभारणी
09 August, 2025
इस्लामपूर दि.९(जरंडेश्वर समाचार):-राजारामबापू सहकारी बँकच्या माध्यमातून इस्लामपूर येथील न्यायालयासमोरील मुख्य चौकात (आयलँडच्या जागेवर) लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा दिमाखदार पुतळा उभा करू, अशी घोषणा माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे केली. आ. पाटील यांनी शुक्रवारी सकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकत्यांशी चर्चा करून हा निर्णय जाहीर केला.
मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने जयंती महोत्सव समिती स्थापन करून जयंतीच्या रात्री कचेरी चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आज ८ व्या दिवशी गोड समारोप झाल्याने कार्यकत्यांनी आ. जयंतराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व एकमेकांना पेढ़ा भरवून आनंदोत्सव साजरा केला.
तहसिलदार सचिन पाटील, राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, युवा नेते प्रतिक पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव, दादासाहेब पाटील, अरुण कांवळे, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे डॉ. विजय चांदणे, शंकरराव महापुरे, डॉ. सुधाकर वायदंडे, नंदकुमार नांगरे, संदीप पाटोळे, उत्तम चांदणे, विनोद बल्लाळ, विकास बल्लाळ, टक्कर आंदोलनात जखमी झालेले रामभाऊ देवकुळे, बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण, दलित समाज व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले, राजारामबापू सहकारी बँक आजच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देईल. त्यांच्या मंजूरीनंतर बैंक आपणा सर्वांना विश्वासात घेऊन स्वनिधीतून हा पुतळा उभा करेल. त्यासाठी वर्गणी अथवा कोणाकडे हात पसरणार नाही.
आपल्याकडे नगरपालिकेची सत्ता असताना कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व भार तरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे. अण्णाभाऊ साठे तालुक्याचे भूषण आहेत, त्यांच्या नावलौकिकास साजेसा पुतळा उभा करू. तालुक्यातीलइस्लामपुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना आ. जयंतराव पाटील समवेत प्रतिक पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, अॅड. चैर्यशिल पाटील, डॉ. विजय चांदणे, शंकरराव महापुरे व समितीचे कार्यकर्ते.
इस्लामपूरकरांच्या मनातील मला कळते..कार्यकर्त्यांनी चर्चवेळी ही जागाही आमच्या डोळ्यासमोर होती असे सांगितले. त्यावेळी आ. पाटील यांनी हो, मला माहित आहे. तुम्ही या जागेतच पुतळा बसविणार होता. मात्र इकडे बसविला. इस्लामपूरकरांच्या मनात जे आहे, ते मला कळते असे म्हणताच सवाँनी हास्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्या.
आ. पाटील यांचा मुख्याधिकाऱ्यांना संपर्क..नगरपालिकेचे मुख्याधिकारी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने आ. पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क केला. बँकेच्या वतीने आयर्लंडच्या जागेवर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात पत्र देतील. आपण वरिष्ठांशी चर्चा करून मंजुरी द्यावी, पुतळ्याच्या कामास सुरुवात करता येईल असे त्यांना सांगितले. त्यावर सीओनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
स्वातंत्र्यसैनिकांनी रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात योगदान केले आहे. हाच क्रांतीकारी वारसा जपत उभारलेला लढा कौतुकास्पद आहे. तहसिलदार सचिन पाटील यांनी आ. जयंतराव पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत करून आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले. मात्र शंकरराव माहापुरे,डॉ. विजय चांदणे यांनी प्रशासकीय मंजुरी, कामाची सुरुवात झाल्यावर आम्ही आंदोलन थांबवू तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहील, हा पुतळा इथेच राहील अशी भूमिका मांडली. त्यास आ.पाटील यांनी संमती दर्शविली. प्रा. शामराव पाटील, शहाजी पाटील, अरुण कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष सुर्यवंशी, अँड. धैर्यशिल पाटील, संदीप पाटील, शैलेश पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शंकरराव पाटील, विलास ताटे, अनिल पावणे, हिंदुराव माळी, दिग्विजय पाटील, अभिजित
कुर्लेकर, समितीचे कवीर चव्हाण, अतुल चव्हाण, दिपक मिसाळ, रमेश सकटे, सागर चव्हाण, विजय लोंढे, संजय खवळे, लालासो तांबट, संदीप तडाखे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.