आमदार जयंतराव पाटील यांची जागेसहीत अण्णाभाऊंचा पुतळाही देण्याची केली घोषणा
पूर्णाकृती पुतळादेखील आपण राजाराम बापू बँकेच्या माध्यमातून देत असल्याची घोषणा केली; अखेर अण्णाभाऊंचा पुतळा इस्लामपुरात होतोय...
10 August, 2025
इस्लामपूर दि.१०(जरंडेश्वर समाचार):-वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा झाला पाहिजे अशी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून मागणी केली जात होती पण ती पूर्ण होत नव्हती त्यामुळे अखेर वाळवा तालुक्यातील मातंग समाज बांधवांनी गटतट विसरून एकत्र येत आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा इस्लामपूर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर 1 ऑगस्ट रोजी गनिमी कावा करीत पुतळा बसविला व संघर्ष झाला तरी पुतळा काढणार नाही अशी भूमिका घेतली. यासाठी मुंडण आंदोलन केल, आणि त्याचं बरोबर डोकी फोडून घेत आण्णाभाऊंच्या पुतळयासाठी रक्क सांडत मागे हटणार नसल्याचा इशारा दिला.प्रशासन हादरलं, लोकप्रतिनिधिना दखल घ्यावी लागली आणि वेगाने घडामोडी घडल्या आमदार सदाभाऊ खोत तर बैठकीला उपस्थित होतेच पण त्याचचरोबर शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी देखील आंदोलकांची भेट घेत आम्ही सोबत असल्याचे संकेत दिले,
मात्र या सर्वांवर कड़ी करीत आमदार जयंतराव पाटील यांनी नुसती आंदोलकांची भेट घेतली नाही तर आपल्या स्वताच्या राजाराम बापू पाटील बँकेची दीड गुंठे जागा देण्याची महत्वपूर्ण घोषणा तर केलीच शिवाय आण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा देण्याची घोषणा करीत मुसेद्दी राजकारणी झलक दाखविली. यामुळे आता आण्णाभाऊंच्या पुतळा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सौ सोनार की एक लोहार की अशी आमदार जयंतराव पाटील यांची भूमिका
आणणाभाऊ या पुतळा गेल्या चाळीस वर्षा पासून होत नसल्यामुळे साहजिकच जितका रोष प्रशासनाविरुद्ध आंदोलकांचा होता तितकाच रोष नकळत आमदार जयंतराव पाटील यांच्याबद्दल देखील होता पण मातंग समाजासह बरेच नेते देखील त्यांना मानणारे असल्यामुळे उघड बोलत नव्हते मात्र यावेळी मातंग समाजातील प्रत्येक नेत्याने आपले असणारे संबंध बाजूला ठेवत आण्णाभाऊंच्या प्राधान्य दिल्याने आता काय होणार असा प्रश्न निर्माण करायला होता मात्र ही कोडी स्वता फोडत व आपली जबाबदारी आणि कर्तव्य खंत अगदी अंतिम टप्प्यात करेक्ट कार्यक्रम केला आणि 'सौ. सोनार की एक लोहार की' हे दाखवून देत अतिशय मोक्याची असणारी दीड गुंठे जागा ताब्यात दिली, शिवाय अण्णाभाऊ यांच्या पूर्णाकृती पुतळादेखील आपण राजाराम बापू बँकेच्या माध्यमातून देत असल्याची घोषणा केली.