single-post

फुले शाहू आंबेडकर विचार जागर; स्मृती हरी नरके एक अभिवादन!

फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा प्रभावी वक्ता

10 August, 2025

फुले शाहू आंबेडकर विचार  जागर; स्मृती हरी नरके एक अभिवादन!

स्मृतींना महत्त्व काय असते? स्मृति हा नात्यांच्या इतिहासाचा एक पट असतो, पण स्मृतींना जागवण्यात मानवी मनाची विचाराची महती असावी लागते .ज्या समाजात व्यक्तींचे अस्तित्व विचार अस्तित्व म्हणून स्वीकारले जात नाही. अशा समाजात विचाराची उपेक्षा सर्वच प्रकारची होत राहते. विचार उपेक्षा प्रस्थापित करून समाजजीवन पुढे चालू ठेवणाऱ्या विचारधारांचे गतिरोधाचे वास्तव हे समजून घेणे.हे खूप महत्त्वाचे आहे. विचारधारांचे अन्वेषण आकलन आणि त्यासाठीचा निरंतर प्रबोधनाचा वसा घेणारे जागृत प्रबोधनकारी विचारक व प्रबोधन कर्ते त्या काळात खूप महत्त्वाचे असतात. व्यक्ती ही विचारी असेल तर ती व्यक्ती ही प्रबोधनकारी   भूमिका पार पाडत असतेच  असे नाही. पण व्यक्ती ही निरंतर विचारधारांच्या अन्वेषणासाठी संघर्ष करीत असेल तर अशा व्यक्तींना शत्रू आणि उपेक्षा खूप वाट्याला येतात.  तरीही या सगळ्या वर्तमानाच्या अवस्थांचे भान ठेवून आपला प्रबोधनाचा वसा पुढे नेण्यासाठी अथक प्रयत्न करणारी ऊर्जावान व्यक्तिमत्व त्या त्या कालखंडात असतात. आणि वर्तमानकालामध्ये सुद्धा अशी व्यक्तिमत्व  आज आहेत.

वर्तमान हा इतिहासाच्या दडपलेल्या आणि उपेक्षित ठेवलेल्या विचारधारांच्या विचार विश्लेषणाचा जागराचा असतो. तो असायला हवा. विचारधारांचे आकलन हे अभ्यासकांच्या प्रबोधनकर्त्यांच्या, वक्त्यांच्या आस्थेचा विषय असतो. स्वयं विचारधारांचे आसक्तीचे भान अनेकांना असते. महाराष्ट्र देशी सुधारक विचाराच्या धारांचे अभ्यासून स्वयं आकलन वाढवून वर्तमान हा बदलायला हवा.असे अंतरिक ओढ अनेकांना असते.

90 च्या दशकात महाराष्ट्रात पुणे स्थित महात्मा फुले विचारधारेचा एक युवक अशा विचाराने झपाटलेला तयार होऊ लागतो तो कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना समकालीन विचार पिटांशी जोडून स्वतः हे सगळे सांस्कृतिक चिकित्स्याचे भान स्वतःचे वाढवतो आणि प्रबोधनाचा मानकरी तो प्रस्थापित होतो ही गोष्ट खूप अवघड असते.

हरी नरके हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आईने सांभाळलेला गरीबीच्या असंख्य चटके सहन करीत. टेल्को स्थित कंपनीत नोकरी करत असताना 1984 ते 85 च्या कालखंडात नाही . पुणे विद्यार्थी वस्तीगृहात त्याचा सहवास लाभला नोकरी महात्मा फुले प्रतिष्ठानचे संशोधन विभागाचे काम या सगळ्यांमध्ये गतिमान पद्धतीने धावणारा हा सहकारी आगामी तीन दशकात जवळून पाहता आला त्याच्या वाचन प्रबोधन वक्तृत्व आणि महाराष्ट्रभर जनजागृती दौरा हे सगळे थक्क करणारे होते 

कोणत्याही दडपलेल्या विचारधारा उजागरकरण्यासाठी करणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्या प्रति सावध भूमिका बाळगून नेहमी माध्यम वागतात याचे भान बाळगून आपल्याकडे असलेल्या एका क्षमतेचा अर्थातच वक्तृत्व कलेचा वापर करून जनमना पर्यंत पोहोचण्यासाठी सतत धडपडणारा नवे मित्र नव्या संस्था नवी विचारपीठे,यांच्याशी संलग्न राहून समकालीन प्रमाणकारी संस्थांशी संबंध प्रस्थापित करून त्यात हस्तक्षेपी निर्णय घेणारा आणि त्यामध्ये मांडणीची स्वतःचे अधिकार प्रस्थापित करणारा हा एक वक्ता प्रबोधक कार्यकर्ता म्हणजे हरी नरके होय.

वक्तृत्व हे स्पर्धा जिंकण्यासाठी जशी असते तशा नव्या विचारांच्या आकलनाच्या अभ्यासापर्यंत पोहोचण्यासाठी ते विकसित व्हावे लागते 90 च्या दशकात महाराष्ट्रात अनेक वक्ते तयार होताना पाहता आले पण त्यात विचारधारेचा मानकरी शेवटपर्यंत भूमिका  निभावणारा हरी नरके हा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा प्रभावी वक्ता महाराष्ट्राने अनुभव आहे. अनेक संस्थात्मक पदांच्या मध्ये टिकून राहण्यासाठी करावे लागणारे तडजोडीचे राज्यकरण करणारा आणि त्या मध्ये दिग्दर्शन करून नवनेतृत्वांना मदत करणारा हरी नरके हा प्रभावी जादूमय वक्ता म्हणून महाराष्ट्राने अनुभवला 90 उत्तर च्या कालखंडात हिंदुत्व डोके वर काढत होते त्याच काळात फुले व आंबेडकर आणि शाहू या विचारधारांचे ग्रामीण महाराष्ट्रात विचारधन पोहोचवण्यासाठी झंजावाती प्रयत्न करणारा हा युवक हा अनेकांना संधी साधू आणि मौलिक प्रबोधन करता वाटत होता .

महात्मा फुले विचारधारेच्या प्रबोधनात त्याचे स्थान कायम पणे टिकून राहील इतके अथक कष्ट प्रयत्न त्यांनी केले आहेत हरीने केलेले संशोधन विभागातील काम फुले वाङ्मय विभागातील राज्य सरकारच्या समित्यांवरील दीर्घकालचे काम ही आश्चर्यजनक गोष्ट आहे कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या पाठबळ नसलेल्या केवळ स्वतःच्या वक्तृत्व प्रबोधन आणि नवनवीन संदर्भीय ज्ञान आणि बिनतोड युक्तिवाद याच्या आधारे हा संशोधकांच्या मध्ये  निर्णयक ठरलेला अभ्यासक म्हणजे हरी नरके होय . हरी नरके जातीय व्यासपीठा वरील फुले विचार धारेचा वक्ता म्हणून जशी महाराष्ट्रभर मान्यता मिळाली आणि स्वीकृतीही मिळाली ही अपवादात्मक गोष्ट आहे 

परिवर्तनाच्या चळवळी त्यांचे मठ त्यांचे गट त्यांचे विद्यापीठ राजकारण व महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या विविध अभ्यास मंडळातील हस्तक्षेपी काम करत हे सगळे समजावून घेत पुढे जाणारा हा युवक आंतरिक सतत विचाराचा अस्वस्थ होता. 

हरी नरकेने महाराष्ट्र मनाचे फुले शाहू आंबेडकर विचाराचे केलेले प्रबोधन ही त्याच्या कार्याची महाराष्ट्रावरील  ऋणाची गोष्ट आहे. अभ्यासकांना संस्थांची गरज असते पाठिंबाही हवा असतो अभ्यासकांना राजकीय पक्षांचे पाठबळ ही हवे असते त्यांची विचार व्यासपीठे त्यांना हवी असतात. हे सगळे भान बाळगून या सर्व संधीसाठी प्रयत्न करणारे हरी नरके ही द्वेष त्यास सहन करावी लागलेली जवळून पाहता आले आहे. 

महाराष्ट्र देशी वाढत चाललेल्या संकीर्ण विचारसरणी आणि गटांचे राजकारण चळवळींचे राजकारण हा नेहमी मतभेदाचा टीकेचा विषय राहिला आहे हिंदुत्ववादी विचारधारा समाजवादी विचारधारा डावी विचारधारा स्त्रीमुक्ती दायी राजकारण आणि त्याच वेळेला सुधारकांचा विचार या सर्व गटांच्या मध्ये वेगवान पद्धतीने आक्रमक पद्धतीने मांडणारा हा प्रबोधक वक्ता महाराष्ट्रने खूप अनुभवलेला आहे आणि म्हणून त्याची स्मृती ही विचार स्मृती म्हणून जपणे आणि ती पुढे चालू ठेवणे हे विचार स्मृतीचे राजकारण आता नव्याने प्रस्थापित करण्याची गरज आहे वैयक्तिक संपर्क आठवणी आणि प्रसंग आणि त्यातील हितसंबंधांचे राजकारण यामध्ये सारस्य असलेल्या मराठी मनाला हे जर समजले नाही तर महाराष्ट्र हा नेहमी विचार उपेक्षेचा राज्य ठरतो आणि इथे विचाराचे प्राबल्य महत्व आणि त्याची स्वीकृती याचे कपट राजकारण होऊन देणारा एक कारस्थानी व्यासपीठांचा व्यवहार इथे सतत चालत असलेला दिसून येतो प्रकाशन संस्था प्रबोधन करणारी नियतकालिके अनेक चळवळीचे अनेक आंदोलने आणि त्यातील निर्माण झालेले वाद आणि त्यात हस्तक्षेपी भूमिका आणि युक्तिवादाची अत्यावश्यक भूमिका निभावणारा हरी नरके हा अनेकांच्या दृष्टीने सहमती व असहमतीचा विषय ठरेल पण त्यांनी केलेले काम ही एका व्यक्तीच झंजावाती प्रबोधन मान्य करावे लागेल महाराष्ट्र आज फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काळवंडलेले वातावरण अनुभवत आहे इथे हिंदुत्व सावरकर विचारधारा आणि मूलतत्त्ववादी अनेक संकीर्ण जातीय सुधारकांच्या प्रवृत्तीचा प्रभाव वाढतो आहे अशा कालखंडात सुधारकांना जातीत बंदिस्त करण्याची स्पर्धा लागलेली आहे अनेकांनी नवे धर्म संप्रदाय प्रस्थापित करून महाराष्ट्र भरकटवत ठेवण्याचे काम चालवलेले आहे इथे बहु संस्कृतिक सत्यशोधकीय विचारधारा संपुष्टात आणण्याचे प्रयत्न उदारमतवादी सुधारक जातीयवादी हे काम करत आहेत अशा कालखंडात हरी नरके आपल्या जीवनाची यह लोक यात्रा सोडून जातात ही गोष्ट विचार विश्वाला पोकळी करून देणारी ठरली आहे

अभ्यासक वक्ता संशोधक आणि समकलीन महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकर राजकारणाची दिशा ओळखणारा हा एक प्रबोधक अनेकांना आवडला आणि त्याबद्दल नाराजी ही पहावयास मिळाली पण हे सर्वच सुधारक प्रबोधकांच्याबाबत घडते ते त्याच्याबाबत घडले या मध्ये आश्चर्य नाही.

 समकालीन प्रबोधन राजकारणाला आव्हान देणे त्यांची कपटकारस्थानी ओळखणे नव्या विचार व्यासपीठावर वरून प्रतिवाद करणे ही भूमिका हरी नरके यांनी समता परिषदेतून आणि फुले शाहू आंबेडकर विचार व्यासपीठावरून निभावली ही न आवडणारी गोष्ट महाराष्ट्राला विचारधारांचे कपट राजकारण करण्यामध्ये स्वारस्य असल्याने हे घडले आहे हे नाकारता येत नाही.

प्रस्थापित जाती आणि गट धनिक यांना हे राजकारण स्वतः करावे आणि तळातील जाती प्रबोधक कार्यकर्त्यांनी

हे करू नये हे वाईट आहे ही अनैतिकता आहे असा डांगोरा पेटणारे तब्बल चार दशकातील अनेक मान्यवर जवळून हरी नरकेचा विचार सहसाथी असल्याने हे निरीक्षणातून पाहता आले आहे ते समजले आहे.

वर्तमान हा सुद्धा एक संधीचा विषय असतो वर्तमानातील प्रदूषित विचार वारा आणि भरकट होणारे प्रबोधन विश्व हे दिशा कोणत्या दिशेने वाहते आहे हे सर्वात जास्त समजून घेणारे हरी नरके ही ही मोठ्या उर्जेची ज्ञान आसक्ती , अभिव्यक्तीची व प्रचंड आयोगाची माननीय व्यक्तिमत्त्वाची ती शक्ती होती . हे कोणीच मान्य करणार नाही पण काळाच्या ओघांमध्ये हे मान्य करावे लागेल इतकी विचार व्यासपीठावरील अथक त्यांनी केलेले प्रबोधन महत्त्वाचे ठरते तब्बल चार दशके फुले शाहू आंबेडकर विचार जागर करणारा समतेचा सत्यशोधक विचारधारेचा आंबेडकरी विचार झालेला बंधू मानून काम करत राहिलेला शाहूंच्या  जगत गुरु पिठ सतत जागृत ठेवणारा हा जागर कर्ता अनेकांच्या नाराजीला कारणीभूत जरी ठरला असला तो कित्येकांना आवडला ही नसला तरी त्याच्या उर्जेने महाराष्ट्राचे मनाचे विचार विश्व फुले शाहू आंबेडकर विचारधारेसाठी थोडे सजग केले हे योगदान सतत मान्य करावे लागते त्याबद्दल त्याच्या प्रती महाराष्ट्राच्या विचार विश्वाच्यावतीने नेहमी ऋणात राहावे लागेल असा हा हरी नरके चळवळी संशोधन ज्ञान क्षेत्रातील कपट राजकारण ओळखून आव्हान देणारा एक कृतीशील वक्ता

हे त्यांचे कार्य त्यांच्या स्मृती उत्तर काळात सतत समजावून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्यक्ती काळाचे अपत्य असते व्यक्ती काळाच्या विचारधारांचे आकलन असते व्यक्ती काळाच्या विचारधारांच्या साठी अविस्कृत अभिव्यक्ती आणि प्रबोधन करीत राहते ती मांडणी करते ते संशोधन उजागर करते हा त्या त्या काळातील व्यक्तींमत्व विचाराचा राजकारणाचा भाग असतो .त्यातीलच एक हे लख्ख आणि प्रभावी व्यक्तिमत्व हे महाराष्ट्र देशी  फुले शाहू आंबेडकरांच्या संशोधन नव विचार स्मृती देऊन गेले आहे हे विचारविश्वाने स्वीकारणे खूप महत्त्वाची आहे विचाराचा नकार हा अपघात असतो विचाराचे नाव संशोधन  न स्वीकारणे हा संकीर्ण विचारधारांचा नित्य उद्योग असतो महाराष्ट्रात फुलेविरोधक शाहू विरोधक हिंदुत्ववादी विचारधारांनी हे वर्तन काल केले होते आजही करीत आहेत आणि ते उद्याही करीत राहणार आहेत म्हणून देवाच्या दलालांना हाकलून देणारे मध्य स्थानांना करणारे महात्मा फुले आणि त्यांचा सत्यशोधक समाज ही महाराष्ट्र देशी सर्वकालिक स्वीकारावी लागणारी विचारधारा असल्यामुळे या विचारधारेचा एक मानकरी इथे असा आता कष्टत राहिला होता हा ही एक प्रबोधनाचा इतिहास महाराष्ट्राला मान्य करावा लागणार आहे इथे वंशवादी वर्णवादी आणि छुपी देशी प्रबोधनवादी

खूप आहेत विद्यापीठात यांचे प्राबल्य आहे वर्तमानपत्रात यांचेच सर्व काही चालू आहे अशा महाराष्ट्राच्या संकीर्ण विचार विश्वातला बेधडक प्रबोधक म्हणजे हरी नरके होय हरी नरके हा फुले शाहू आंबेडकर विचाराचा नव फाशीवादाच्या पूर्व कालखंडातील आव्हान प्रति आव्हान देणारा हा अभ्यासक जर समजून घेतला नाही तर नव फासीवादाच्या वंशवादाच्या ऊनमाध हिंसाकाळात फार मोठा दोष सर्वांचाच ठरेल हे होऊ द्यायचे नसेल तर 

हरी नरकेच्या स्मृतिदिनी नवनीत व मानव्याचा विचार करणाऱ्या सर्व विचारधारांनी प्रबोधनाची अपरिहार्यता आणि प्रबोधनाचे मानकरी नेहमी अहम मानून त्यांना हृदय स्थानी स्थान देण्याची गरज आहे त्यांच्या स्वप्नातील ही विचार विश्लेषणाची अथक वाट प्रत्येकाला महाराष्ट्र घडवण्यासाठी चालावी लागेल हे काम करीत राहणे हीच नवफासीवादाच्या व वंशवादाच्या हिसेच्या जवळ आलेल्या कालखंडात हे अत्यावश्यक महत्त्वाचे काम ठरणार आहे हे यथा तथा गती आणि शक्तीने करत राहणे याशिवाय तुर्त स्मृतींना काहीही अर्थ नाही स्मृती या कार्यातूनच प्रस्थापित करणे त्या विचाराचरणाचा विषय बनवणे हा स्मृतींचा नवा अन्वयार्थ महाराष्ट्राला नवयुवकांना युवतींना विद्यापीठ अभ्यासकांना याचे महत्त्व कळेल तरच विचार साथी स्मृतीशेष हरी नरकेंना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात एक सार्थकता आहे .हे विचाराची सार्थकता समजावून घेण्यासाठीच स्मृतीचा संपर्कापलीकडेच्या विचार महात्म्याचा जागर केला आहे.

-उपप्राचार्य शिवाजी राऊत पत्रकार, लेखक विश्लेषक अभ्यासक सातारा .