सातारा जिल्हा परिषद आवारात वृक्षतोड करून रक्षाबंधन साजरा.?.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये फुले शाहू आंबेडकर यांचे पुतळे बसवण्यासंदर्भात ठराव झाला होता! परंतु अद्याप पुतळे बसवले नाहीत मात्र लोकनेतेची स्मारके होत आहेत याचे आश्चर्य लोकांना वाटत आहे!
10 August, 2025
सातारा दि१०(जरंडेश्वर समाचार) अजित जगताप यांच्या कडून: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.. असे साधुसंतांनी सांगून वृक्षाचे महत्व पटवून दिले होते. अनेकांनी या वृक्ष वाढीसाठी स्वतःचा घाम गाळला. परंतु, अलीकडे वृक्षबाबत सोयर सुतक नसल्याचाच कारभार पाहण्यास मिळत आहे. निसर्गाने भरभरून दिले आहे. याची आठवण म्हणून अनेक जण रक्षाबंधन दिवशी वृक्षाला राखी बांधून त्याच्या संरक्षणाची हमी देतात. याला सातारा जिल्हा परिषद आवर अपवाद ठरला आहे.
सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी या वृक्षतोडाला परवानगी दिली होती का? दिली नसेल तर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सातारा शहर परिसरातील नागरिकांनी केलेले आहे.
सावली दिलेल्या मोठ्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. हा नजारा खिडकीतून काही अधिकारी निमुटपणे पाहत आहेत. अशी चर्चा सातारा जिल्हा परिषदेमध्ये नियमित व्हिजिट देणाऱ्या विजिटरने केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात पूर्वी लोकल बोर्डाची इमारत, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग असे कार्यालय होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निर्मितीनंतर या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाची अनेक जण आठवण काढतात. याच परिसरामध्ये भूजल सर्वेक्षण, पतसंस्था कार्यालय व उपाहारगृह होते. त्या जागी आता लोकनेत्यांचे स्मारक होत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या पूर्वीच्या सदस्यांनी फुले शाहू आंबेडकर यांचे पुतळे या परिसरात बसवण्यासाठी मंजुरी दिली होती, ठराव केला होता अशी माहिती जिल्हा परिषद च्या एका सदस्याने सांगितले परंतु आज ही फुले शाहू आंबेडकर यांचा पुतळा या परिसरामध्ये बसवला गेलेला नाही, ही शोकांतिका आहे! मात्र लोकनेतेची स्मारकाला तात्काळ मंजुरी मिळते! फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रातीला नव्हे तर देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी दिशा दिली , देश घडवण्यामध्ये या महामानवांचे योगदान मोठे आहे, अशा महामानवांचे पुतळे या परिसरामध्ये बसवले जात नाहीत, ही मानसिकता येथील नेत्यांची आहे!
रक्षाबंधन दिवशीच भावाला खुश करण्यासाठी बहिणीची परवानगी नसतानाही वृक्षतोड झालेली आहे. वृक्षतोड करत असलेल्या परिसरामध्ये लोकनेत्यांचे स्मारक होत आहे.
जुन्या नेत्यांचा आदर्श घ्यावा. अशी त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द कायमस्वरूपी जतन करावी अशीच आहे. ऐतिहासिक वास्तू जतन करताना त्याची काळजी घ्यावी लागते. पण ऐतिहासिक वृक्ष बाबत ही काळजी घेतली नाही. म्हणून काळजी वाटत आहे.
या वास्तूमध्ये स्मारकाच्या निर्मितीसाठी जुन्या नेत्यांनी लावलेल्या काही वृक्षांची तोड करण्यात आलेली आहे. सदरच्या वृक्ष लागवडीने खऱ्या अर्थाने सावली लाभली होती. आता ही सावली बाजूला करून स्मारक दिसावं यासाठी प्रयत्न केला आहे. शेवटी सत्तेचा वापर स्वतःसाठी केला नाही तर मग सत्ता काय कामाची ? हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्याला सातारा जिल्हा अपवाद नाही. उलट विरोधकांची ही मूक संमती आहे. हे सुद्धा लपून राहिलेले नाही.
आज रक्षाबंधन दिवशी सुट्टी असल्यामुळे या परिसरात काही वृक्षप्रेमी व ऐतिहासिक वास्तू बांधकामाबाबत अभ्यास असणाऱ्या अनेकाने दूरध्वनी करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पर्यायी वृक्षारोपण झाले का नाही? याची माहिती मिळाली नाही. परंतु महामार्गावर अनेक झाडांची कत्तल झाल्यामुळे पूर्वीचा महामार्ग आता ओसाड माळा सारखा दिसत आहे .भविष्यात हेच धोरण राहिले तर प्रत्येकाची सत्ता येणार आहे. आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांसाठी स्मारक व्हावे .अशी आतापासूनच मागणी पुढे आलेली आहे. ही काळाची महिमा ठरणार आहे. दरम्यान शासकीय सुट्टी असल्यामुळे जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकारी भेटले नाहीत. आणि भेटले असते तर त्यांनी कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही हे सिद्ध करून दाखवले असते. हा भाग वेगळा आहे.