इस्लामपुरात अण्णा भाऊंच्या पुतळ्यासाठी टक्कर मोर्चा
डोके फोडून घेऊन आंदोलनकर्त्यांचा आक्रोश : आत्महत्या करण्याचा इशारा
07 August, 2025
इस्लामपूर दि.७(जरंडेश्वर समाचार) इस्लामपूर शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीसाठी टक्कर मोर्चा आंदोलन झाले. तिघा तरुणांनी आपले डोके फोडून घेत रक्त सांडून प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध केला. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी आमचे रक्त सांडलेय. आतां इस्लामपुरात पुतळा उभारला नाही तर आम्ही फास लावून येवू असा इशारा आंदोलनकत्यांनी प्रशासनाला दिला.
इस्लामपूरात अण्णाभाऊंचा पुतळा व स्मारक व्हावे, अशी ३०-४० वर्षापासूनची मागणी आहे. इस्लामपूरात १ ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव समितीच्या वतीने इस्लामपूर तहसिलदार कचेरीसमोर सत्यशोधक अण्णाभाऊंचा अर्धपुतळा बसविला आहे. त्याच ठिकाणी पुतळा कायमस्वरूपी व्हावा. अशी मागणी आहे. गनिमी कावा करून तात्पुरता बसवलेला पुतळा पोलिसांकडून हटवला जावू नये म्हणून कार्यकत्यांनी २४ तास पहारा ठेवला आहे. बुधवारी टक्कर मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील
प्रमुख मार्गावरून हा मोर्चा तहसीलदार कचेरी चौकात आला. तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता, पोलीस प्रशासनाने मोर्चेकरांना तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रोखले, तरुणांनी रस्त्यावर डोके आपटून घेत निषेध व्यक्त केला. रक्तबंबाळ झालेल्या तिघांना पोलिसांनीरुग्णालयात उपचारासाठी हलवले. दरम्यान तहसिलदार कचेरीत कार्यकतें मुसंडी मारत आत घुसले. मात्र निवेदन स्विकारण्यास कुणी जबावदार अधिकारी नसल्याने कार्यकत्यांनी घोषणाबाजी करीत कार्यालय दणाणून सोडले आणि प्रवेश द्वारात ठिय्या दिला.
इस्लामपूर प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर टक्कर मोर्चा काढण्यात आला. इस्लामपूर तहसील कार्यालयात आंदोलकांनी ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी केली. रक्तबंबाळ अवस्थेतील आंदोलक राम देवकुळे, बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण यांनी आपले डोके आपटून अण्णा भाऊंचे पुतळा व स्मारक तात्काळ व्हावे यासाठी स्वतःची डोकी रस्त्यावर आपटून आंदोलन केले
यावेळी मोर्चाचे रूपांतर मेळाव्यात झाले कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.यावेळी शंकर महापुरे, उत्तम चांदणे, तानाजी साठे, डॉ. विजय चांदणे, संदीप पाटोळे, विकास बल्लाळ, सुधाकर वायदंडे, नंदकुमार नांगरे, भास्कर चव्हाण, राम देवकुळे,आदींची भाषणे झाली.
अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी ७ ऑगस्टला महत्वाची बैठक अण्णाभाऊंच्या पुतळ्याच्या संदर्भात प्रशासनाच्या पातळीवर गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी प्रांत श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह आंदोलनकत्यांमध्ये बैठक आयोजित केली आहे. पुतळा उभारण्यासंदर्भात चर्चा करू. पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करणे, अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक उभे करू. कायदेशीर मागनि आंदोलन करून यश मिळवू या. शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. अशी ग्वाही आ. सदाभाऊ खोत यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.
रक्तबंबाळ स्थितीत कार्यकर्त्यांचा घोषणा
अण्णा भाऊंच्या पुतळ्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा तहसीलदार कचेरी चौकात आला. बापूराव बडेकर (कासेगाव), भास्कर चव्हाण (नेलें) रामभाऊ देवकुळे (बहे) या तरुणांनी डोके आपटुन घेतले, रक्तबंबाळ अवस्थेत कार्यकत्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
कबीर चव्हाण, विनोद बल्लाळ, रवि बल्लाळ, शशिकांत वायदंडे, दीपक मिसाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अरुण कांबळे, कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील, शाकीर तांबोळी,कॉ. दिग्विजय पाटील, सुधीर कांबळे, गणेश शेवाळे, प्रहारचे दिग्विजय पाटील यांच्यासह समविचारी पक्षाच्या कार्यकत्यांनी मोर्चास भेट देऊन पाठिवा व्यक्त केला.