कोरेगाव चे केदारेश्वर मंदिर जिल्ह्याच्या वैभवात भर घालेल आ. महेश शिंदे
केदारेश्वर मंदिराचा भूमीपूजन संपन्न , मंदिराच्या कामाला प्रारंभ;निधीची कमतरता भासू देणार नाही
05 August, 2025
कोरेगाव(जरंडेश्वर समाचार) दि.४:- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री केदारेश्वर मंदिराची भव्य दिव्य अशी इमारत कोरेगाव लोकप्रिय आमदार महेश शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारणी केली जाणार आहे. त्या मंदिराचे पावित्र्य कायम राखले जाणार असून स्ट्रक्चरला कोणताही हात न लावता, या मंदिर उभारण्याचे काम केले जाणार आहे. मंदिराला निधी कमी पडू दिली जाणार नाही. कोरेगाव शहराच्या नव्हे तर जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारे हे मंदिर दिमाखदारपणे कोरेगाव शहरात उभे राहील, असा विश्वास विकास कामाचा महामेरू असणारे आ. महेश शिंदे यांनी मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केला.
कोरेगाव शहरातील फार प्राचीन असे हे श्री केदारेश्वर मंदिर आहे. या परिसरात सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य असे मंदिर उभारले जात आहे. त्याचे भूमिपूजन श्रावणी सोमवारचे औचित्य साधून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. महेश शिंदे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बर्गे व मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, कोरेगाव नगरीचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष राहूल बर्गे ,जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दिपाली बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन बर्गे, सुनील बर्गे,आदी मान्यवर यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, नितीन ओसवाल, खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, जयंती बहुआ, सुरेश कुलकर्णी, अॅड. चंद्रशेखर बर्गे, विलासराव बर्गे, सुरेश बर्गे, काकासाहेब बर्गे, बाबूजी बर्गे, रामकाका बर्गे, दिलीप बर्गे, संजय काटकर यांच्यासह कोरेगाव विकास,आघाडीचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
आ. महेश शिंदे म्हणाले, श्रावणी सोमवारी मंदिराच्या इमारतीचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली आहे, हे मोठे पुण्यच म्हणावे लागेल. केदारेश्वर मंदिराला प्राचीन काळापासून चा मोठा इतिहास आहे.
केदारेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. श्री केदारेश्वराच्या आशीर्वादाने कोरेगाव शहरासह विधानसभा मतदारसंघात सर्व विकासकामे मार्गी लागली आहेत. आज कोरेगाव नगरीचा सर्वांगीण विकास होत असून चौफेर बाजूने विकासकामे दिसत आहेत, ती केदारेश्वराची पुण्याई आहे. एक भाविक या नात्याने मंदिराच्या नूतन इमारतीचे डिझाईन करताना मी स्वतः व्यक्तिगत लक्ष घातले. आवश्यक ते बदल केले आणि भाविकांना मंदिर परिसरात वावरताना कोठे अडचण येणार नाही याची दक्षता घेतली. कोरेगावकर नागरिकांनी आणि विशेष करून भाविकांनी या मंदिर परिसराचे पावित्र्य टिकवावे. या परिसरात धार्मिक उपक्रमांचे आयोजन करून नव्या पिढीलाही त्यात सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही आ. महेश शिंदे यांनी केले.
अनेक वर्ष मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवले आहे. कोरेगाव शहराचा विकास करत असताना मंदिर परिसराचा विकास करण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी देशभरातील किंबहुना राज्यातील प्रसिद्ध देवस्थान परिसराचा आराखडा विचारात घेऊन कोरेगाव येथील मंदिराची आकर्षक डिझाईन तयार करण्यात आले आहे. हे काम श्री केदारेश्वरच्या आशीर्वादाने पूर्णत्वाकडे लवकरात लवकर जाईल,
असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी सुनील खत्री, राहुल बर्गे व महेश बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष नलावडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर विरकर, संतोष बर्गे, राजेंद्र वैराट, परशुराम बर्गे, प्रीतम शहा, नगरसेविका स्नेहल आवटे, संजीवनी बर्गे, वनमाला बर्गे, संगीता ओसवाल, शितल बर्गे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.