single-post

सर्वसामान्य जनतेला न्याय आणि सुरक्षा देण्यात अपयशी ठरलेले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा राज्यपाल महामहीम यांनी घ्यावा- चंद्रकांत खंडाईत

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा तसेच संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करावे ,या इतर मागणी मान्य न झाल्यास जन आंदोलन उभारणार चंद्रकांत खंडाईत

06 August, 2025

सातारा (जरंडेश्वर समाचार):-सर्वसामान्य जनतेला न्याय आणि सुरक्षा देण्यात अपयशी ठरलेले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा राज्यपाल महामहीम महोदय यांनी घेऊन दोषी पोलीसांच्यावर गुन्हे दाखल करून कायद्याचे राज्य निर्माण करणेत यावे तसेच  इतर विविध मागण्या निवेदन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांना सातारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या वतीने  देण्यात आले.

 महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत ठेवण्या मध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरले असल्याने राज्यात कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी गृह मंत्र्यांना तातडीने राजीनामा द्यायला सांगून राज्याला एक कर्तव्यदक्ष व सक्षम गृहमंत्री राज्याला देऊन कायद्याचे राज्य निर्माण करणेत यावे अशी मागणी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सातारा  यांनी जिल्हाधिकारी यांना  दिलेल्या निवेदनाच्या पत्रकात म्हटले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, बाळासाहेब सावंत,  दयानंद बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत म्हणाले परभणीची घटना ताजी आसतानाच सदर घटने मध्ये पोलीस प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मा. सर्वोच्चन्यायालयाद्वारे देण्याची वेळ येते, या वरूनच कायद्याचे राज्य आहे किंवा कसे हे सांगण्या ची गरज नाही.असे चित्र स्पष्ट आसताना सद्या कोथरूड पुणे येथील तीन महीलांच्यावर ज्या अमानुष पद्धतीने चौकशीच्या नावाखाली जी काय कृती केली, ती कायद्याच्या राज्याला काळींबा फासणारी असून या पोलीस प्रशासनाच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करून त्या तीन महीलांच्या तक्रारी नुसार तातडीने गुन्हे दाखल करणेत यावे, व कठोरात कठोर कारवाई करणेत यावे अशी मागणी केली  आहे .

 या देशाला ज्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला कायदेशीर संविधान दिले त्याच संविधान कर्त्यांचे नातू सन्माननीय अँड. बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी कायदेशीर चपराक गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनास दिली, आशा कायदेशीर पणे लढ़णाऱ्या आंबेडकरी कुटुंबातील दोन व्यक्ती प्रत्यक्षपणे पोलीस प्रशासनाच्या दारात रात्रन दिवस ठीया मारून दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती भेदभाव प्रतिबंधक कायद्या आंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आसताना ही गेली दोन दिवस, पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नाहीत, ही पोलीसांची मुजोरी कोणाच्या सांगण्यावरून चालू आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही त्यामूळे राज्याच्या गृह मंत्र्यांना तातडीने महामहीम राज्यपाल यांनी त्याना माघारी बोलवावे आणि दोषीच्यावर उचीत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी समितीच्या वतीनेकरण्यात आली आहे.

अनूसूचित जाती जमाती भेदभाव प्रतिबंधक कायद्या आंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यात दिरंगाई अथवा कुचराई करेल त्या अधिकाऱ्यांच्यावर सह आरोपींचा गुन्हा दाखल करण्याची तर्तृद आसताना सुद्धा जर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नसतील तर यामध्ये केंद्रीय व राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने तातडीने लक्ष घालून महामहीम राज्यपाल साहेब यांना अहवाल सादर करून तातडीने या मध्ये दोषी असणारे सर्वच पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून हे राज्य कायद्याचे राज्य आहे आणि या राज्यात कोणालाही पाठीशी न घालता सर्वसामान्य जनतेला न्याय आणि सुरक्षीतता पुरविण्याची घटनात्मक जबाबदारी महामहीम राज्यपालांची आहे, ती त्यांनी पार पाडावी आशी मागणी खंडाईत यांनी केली आहे.

या विविध मागण्यांसंदर्भात महामहीम राज्यपाल महोदय यांनी तातडीने लक्ष घालून संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देष देण्यात यावे अन्यथा या प्रश्नाची दाहकता जनतेमध्ये जागृती करून तीव्र स्वरूपाची जनआंदोलन उभारावे लागेल ,याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा सातारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात आला आहे.