निबंधाचे नाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेतांना"..राष्ट्रीय भव्य निबंध लेखन स्पर्धा
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त..चला, एक लाख वाचकांनी अण्णा भाऊंना समजून घेऊया...
06 August, 2025
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त..चला, एक लाख वाचकांनी अण्णा भाऊंना समजून घेऊया!आत्ता, आपल्या घरीच बसून लिहिता येणारी..."राष्ट्रीय भव्य निबंध लेखन स्पर्धा " मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांनी आयोजित केलेली आहे.
"निबंधाचे नाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेतांना"...
मार्गदर्शक समिती : डॉ. बाबुराव गुरव (सांगली), डॉ. मच्छिंद्र सकटे (सातारा), अॅड. डॉ. रमेश विवेकी (लातूर)डॉ. सोमनाथ कदम (कणकवली), मा. माधव सानवेकर (परभणी), मा. अनिल म्हमाने, प्रा. प्रकाश नाईक (कोल्हापूर)आदी मान्यवर आहेत.
स्पर्धकांनी प्रवेश घेण्याची अंतिम दि.३० ऑगस्ट, २०२५ रोजी असून निबंध पाठवण्याची अंतिम दि. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी आहे. स्पर्धेचा निकाल दि.३० नोव्हेंबर, २०२५ रोजी आहे. बक्षीस वितरण दि.३ जानेवारी, २०२६ तसेच कोणाला काही अडचण असल्यास खालील फोनवर सविस्तर माहिती हवी असल्यास फोन न करता ८५३००१३००५ या नंबरवर फक्त सविस्तर माहिती पाठवा असा मेसेज करा असे पत्रिकेत आयोजकांनी म्हटले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्यासाठी नियम व अटी लागू करण्यात आली आहे. स्पर्धकांच्यासाठी भरघोस बक्षिसे,प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस १,००,०००/- (एक लाख) (२५,०००/- रु. रोख आणि ७५ हजारांची पुस्तके)द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस 50,000/- (पन्नास हजार)(१०,०००/- रु. रोख आणि ४० हजारांची पुस्तके) उत्तेजनार्थ २० बक्षीसे 3,000/- (प्रत्येकी तीन हजारांची पुस्तके) सहभागी प्रत्येकास ५,००/-(पाचशे रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र)८५३००१३००५ फोन करण्याची वेळ: सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वा. देशातील सर्व नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.