कोरेगांव शहरातील केदारेश्वर मंदिराचा होणार विकास ;१२ कोटीचा निधी, सोमवारी होणार भूमिपूजन
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर होणार-आमदार महेश शिंदे
03 August, 2025
कोरेगाव येथील श्री केदारेश्वर मंदिर व देवस्थान परिसराचा विकास करण्याचा निर्धार आ. महेश शिंदे यांनी केला आहे. या संदर्भात राज्य शासनाला सादर केलेल्या प्रस्तावातून १२ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. उद्या सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी दहा वाजताआ. महेश शिंदे यांच्या हस्ते मंदिराच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजेंद्र बर्गे यांनी दिली.
तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि जागृत देवस्थान म्हणून केदारेश्वर मंदिराला ओळखले जाते. कोरेगाव येथील केदारेश्वर मंदिराच्या नवीन डिझाईनचा आराखडा. केदारेश्वर मंदिर पुनर्बाधणी आणि सुशोभीकरण प्रकल्प हाती घ्यावा. मंदिर परिसराला नवे रुप द्यावे, अशी मागणी देवस्थान ट्रस्टबरोबरच जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे व माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी आ. महेश शिंदे यांच्याकड यासंदर्भात, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आ. महेश शिंदे श्री केदारेश्वर मंदिराबद्दल आपल्याला विशेष आकर्षण आहे. श्री केदारेश्वराच्या आशीर्वादानेच कोरेगावातील सलग दोनदा विधानसभा सदस्य होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे या मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेतला होता. देशभरातील मंदिरांच्या कामाचा आणि शिल्पकृतीचा आढावा घेऊन कोरेगावातील मंदिर उभारले जावे, असे प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार अत्यंत सुयोग्य डिझाईन तज्ज्ञ वास्तुविशारदांकडून तयार करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर म्हणून कोरेगावचे श्री केदारेश्वर मंदिर ओळखले जाईल, असा विश्वास आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला. तातडीने जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करुन प्रकल्प अहवाल तयार करायचे निर्देश दिले होते. कोरेगाव नगरपंचायतीच्या प्रशासनाने देखील त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. राज्य शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव होता.
नियोजित श्री केदारेश्वर मंदिराची संकल्पित वास्तू श्री केदारेश्वर मंदिर परिसरात स्वयंभू शिवलिंग असून दत्त मंदिर देखील आहे. वर्षभरात या परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्याचबरोबर गोरगरीब कुटुंबातील विवाह सोहळे देखील होतात. विविध सामाजिक संस्था आणि संघटना आपापले समाजपयोगी उपक्रम मंदिर परिसरात वर्षभर आयोजित करतात. आ. महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून मंदिर परिसराचा पूर्णपणे कायापालट केला जाणार आहे. अत्यंत प्रशस्त असे मंदिर उभारले जाणार असून त्यामध्ये तळमजल्यावर सभामंडपाचे दोन मोठे हॉल तयार केले जाणार आहेत. पहिल्या मजल्यावर विवाह सोहळ्यासाठी स्वतंत्र हॉल व भोजनगृह त्याचबरोबर स्वच्छता गृहांची उभारणी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी तात्काळ १२ कोर्टाच्या निधीला मंजुरी दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यासाठी पाठपुरावा देखील केला.