आमचं दैवत अण्णाभाऊ साठे
अत्याचाराविरुद्ध लढणारा योद्धा अण्णाभाऊंच्या कथेचा नायक होता
01 August, 2025
लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा एक ऑगस्ट जन्मदिवस राज्यभर धुमधडाक्यात उत्साही वातावरणात साजरा केला जाणार शोषित पीडित वंचित श्रमिक कष्टकरी कामगार यांच्या व्यथा आपल्या झुंजार लेखणीतून अण्णाभाऊ मांडून महाराष्ट्रातील उपेक्षित घटकांची जनजागृती केली त्यांच्या साहित्याच्या प्रेरणेतून आज दलित समाज संघर्षमय झाला आहे त्यांनी कल्पनाविलास सोडून वास्तववादी जीवनावर आधारित लेखन केले रशियन लेखक गार्गीच्या साहित्याचा प्रभाव अण्णाभाऊ वर झाल्याने त्यांनी लेखणीचे हत्यार उपसले क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन संयुक्त महाराज चळवळीत उडी घेतली पोवाडा लोकनाट्य गाणी लावणी सादर करून समाज जागृतीचे महान कार्य त्यांच्या हातून घडले माणूस हा लेखणीचा केंद्रबिंदू मानून कथा कादंबऱ्या लिहिल्या अन्याय अत्याचारी स्त्रियांना नायक बनवून हातात बंदूक दिली अत्याचाराविरुद्ध लढणारा योद्धा अण्णाभाऊंच्या कथेचा नायक होता अण्णाभाऊंचे साहित्य परदेशातील पोचले त्यामुळे जागतिक कीर्तीचे लेखक म्हणून अण्णाभाऊंचा गौरव झाला अण्णाभाऊ मातंग समाजात जन्मलेला कोहिनूर हिरा होता विविध संस्था संघटना वाटेगाव या त्यांच्या जन्म गावापासून ज्योत आणून विचारांची ज्योत तेवत ठेवतात अण्णा भाऊंच्या कथा कादंबऱ्या पोवाडे हे पुस्तक रुपी साहित्य वितरण वाचन आचरण झाले पाहिजे अण्णाभाऊ नेहमी म्हणत चिडबेकीची विचार करा एकीचा समाज एकसंघ राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन साहित्याचा खजिना लिहून ठेवला अशा थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा -दिलीप कांबळे पत्रकार बावधन