single-post

साताऱ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

सातारा जिल्ह्यात सर्वत्र अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा माहोल

01 August, 2025

सातारा दि.१ :-सातारा दिनांक पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून श्रमिकांच्या तळहातावर उभे आहे असे ठणकावून सांगणारे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साताऱ्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. मान्यवरांनी लोकशाहीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

    साहित्य म्हणजे विचार देणारे खुराक आहे. याची जाणीव ठेवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ग्रामीण भाषेतील गावकुसाच्या बाहेरील नायकांची खऱ्या अर्थाने जगाला ओळख करून दिली. एवढेच नव्हे तर पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून कम्युनिस्ट विचार जोपासण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहीर अमर शेख कॉम्रेड श्रीपाद डांगे आचार्य अत्रे अशा अनेकांच्या समवेत त्यांनी तुरुंगवास भोगला होता. घरच्या परिस्थितीची जाणीव असूनही त्यांनी साहित्यातून एक श्रीमंती निर्माण केली ती आजही आजारावर आहे त्यामुळेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांचे पालखीतून मिरवणूक काढण्यात आली हलगी लेझीम वाद्य या मिरवणुकीला अनेक जण सामील झाली होते. सातारा येथील अण्णाभाऊ  साठे पुतळ्याचे नूतनीकरण होत असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या नजीक विचार पिठावर साहित्यसम्राट अण्णाभाऊंच्या अर्ध पुतळ्याचे उभारणी केली होती. या ठिकाणी येऊन फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ऋषिकेश तथा रावण गायकवाड, अरविंद गाडे, अशोक गायकवाड, संजय गाडे, दादासाहेब ओव्हाळ , अमर गायकवाड, संदीपभाऊ शिंदे,गणेश भिसे, चंद्रकांत खंडाईत, मच्छिंद्रनाथ जाधव, अरविंद गाडे, आदित्य गायकवाड, सुचित्रा कडाळे, त्याचबरोबर पूजा बनसोडे, प्राध्यापक अरुण गाडे, गौरी आवळे, तनवीर शेख, कुंदन तडाखे, अविनाश तुपे , संजय नित्यनवरे, गणेश वाघमारे ,अमोल गंगावणे, बंडू घाडगे, सतीश कांबळे, राजू जेधे ,भगवान अवघडे, संदीप कांबळे, प्रकाश वायदंडे, गव्हाळे यांनीही कार्यकर्त्यांसह लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला भीमशाहीर श्रीरंग रणदिवे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाडा व चळवळीतील गीतांचे सादरीकरण करून डोळ्यासमोर चळवळ उभी केली. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान फटाक्यांची आतिषबाजी व परिवर्तन गीताचा कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक विविध ठिकाणी काढण्यात आली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.