२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना
16 February, 2025
२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे, दि. 16: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या कर्ज योजना राबविण्यात येत असून जुन्नर कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड व लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जुन्नर शबरी शाखा कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक रा.भ. पाटील यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत महिला सबलीकरण योजना, स्वयंसहायता बचतगट, कृषी आणि संलग्न व्यवसाय, हॉटेल ढाबा व्यवसाय, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्ट, लहान उद्योग व्यवसाय, वाहन व्यवसाय, ऑटोरिक्षा, मालवाहू रिक्षा, लघु उद्योंगासाठी स्वतंत्रपणे निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत महिला सबलीकरण योजना-४२, स्वयंसहायता बचतगट-१०, कृषी आणि संलग्न व्यवसाय-३९, हॉटेल ढाबा व्यवसाय-८, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्ट-८, लहान उद्योग व्यवसाय-१७, वाहन व्यवसाय-३, ऑटोरिक्षा, मालवाहू रिक्षा-४, लघु उद्योंगासाठी ६ अशा एकूण १३७ लाभार्थ्यांना योजनेंतर्गत कर्ज योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
आदिवासी समाजातील इच्छूकांनी www.mahashabari.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. कोणत्याही कारणास्तव ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे श्री. पाटील यांनी कळविले आहे.