विषयांतर करून प्रश्न विचारलेल्या प्रश्नाबाबत पत्रकारांना मंत्री गोरे यांनी फटकारले
जल जीवन मिशन सातारा विभाग काम पूर्ण केल्यांना बिले मिळालेत मंत्री जयकुमार गोरे
26 July, 2025
सातारा दि२५: सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनिमित्त आलेल्या ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांना जनता दरबार व आदर्श संजय राऊत यांच्या बाकीच्या बाबत प्रश्न विचारला. यावेळी मंत्री महोदयांनी संबंधित प्रश्न विचारणारांना चांगले फटकारले. त्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झालेली आहे.
सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या युवकाने जल जीवन मिशन च्या कामाचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या केली. त्याला एक कोटी चाळीस लाख रुपये मिळाले नसल्याचा आरोप आहे. सरकारी यंत्रणा हर्षल पाटील कंत्राटदार होता की सबकंत्राटदार या तांत्रिक मुद्द्यावर हात झटकत आहेत.असा प्रश्न विचारला असता मंत्री जयकुमार गोरे म्हणाले तो कॉन्ट्रॅक्टर आहे का? त्याच्या नावावर वर्कऑर्डर आहे का? हे तपासल्यानंतरच त्यावर बोलणं इष्ट होईल, राज्याची मला माहिती नाहीये, परंतु ज्यांची कामे झाली आहेत त्यांना बिले मिळालेले आहेत असे ना.गोरे म्हणाले परंतु काही पत्रकारांना संवेदनशील प्रश्न विचारणे ऐवजी राजकीय प्रश्न विचारण्यातच रस वाटत होता, मंत्री महोदयांना प्रश्न फुढून विचारा असं एक पत्रकार म्हणत होता, आता मंत्री महोदय यांना प्रश्न विचारताना अडचण वाटली नाही परंतु एका पत्रकारांना प्रश्न विचारल्यामुळे अडचण वाटू लागली, फुडून प्रश्न विचारा आता, याचा काय गव्हर्मेंट जीआर आहे का? प्रश्न कोठून, कसे पत्रकारांने विचारावेत, आता या पत्रकाराविषयी तेथे उपस्थित असणारे जलजीवन मिशनचे कंत्राटदार आश्चर्य व्यक्त करत होते.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय विविध शासकीय बैठकी साठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साताऱ्यात आले होते. त्यानंतर काही पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. सातारा जिल्हा परिषदेमध्ये बदलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करण्यात आले होते त्यामध्ये काही प्रमाणपत्र बोगस निघाली. याला सर्वस्वी आरोग्य विभाग व शिक्षण विभाग जबाबदार असून कारवाईबाबत टाळाटाळ होत आहे. याकडे तरी लक्ष वेधून सर्व राज्यातच दिव्यांग बोगस प्रमाणपत्र वितरित करण्याची रॅकेट असून ज्यांनी दाखले दिले आहेत ते दोषी असून त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत बारकाईने लक्ष आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. माजी विधानपरिषद सभापती व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मंत्री गोरे यांनी टिपणी केली. यावेळी त्यांनी ज्यांनी भाकीत केले आहे. त्यांना हा प्रश्न विचारायला हवा. असे सांगून त्यांनी प्रश्न उपस्थित करणारा सल्ला दिला. माण खटाव जनता दरबार बाबत आपण त्या भागात जाऊन थांबून माहिती घ्या. म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील. असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या विकासात्मक कामांबाबत तसेच अनेक आंदोलन होत आहे. अशा वेळेला संबंधितांना प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नांबाबत सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा असते. परंतु, राजकीय प्रश्न विचारून काहीजण सामान्यांच्या प्रश्नाला बगल देतात. याची आता चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी चांगलेच फटकारले. हा सातारा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे. अशी अपेक्षा उपस्थित असलेल्या काही भाजप नेत्यांनी बोलून दाखवली. जानकर व अभ्यासू पत्रकारांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागतात. अधिकारी व मंत्र्यांना जाब विचारला जातो. लोकशाहीची लक्षणे आहेत. प्रसारमाध्यमही त्यांना चांगली प्रसिद्धी देतात. परंतु काही प्रश्न उपस्थित केले तर त्याची कुठेही प्रसार माध्यमात नोंद होत नाही. परंतु इतर प्रश्न विचारणे अवघड जाते व वेळ वाया जातो. याकडे अनेकांनी लक्ष वेधले.घरकुलासंदर्भात बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, महाराष्ट्राला न भुतो न भविष्यती असे घरकुलाचे टार्गेट मिळाले होते. १० वर्षापूर्वी सुमारे साडेतेरा लाख घरकुले राज्याला मिळाली होती आणि या सहा महिन्यात ३० लाख घरकुले राज्याला मिळाली आहेत. संपूर्ण देशात कुठल्या राज्याला एवढी घरकुले मिळाली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी मिळालेल्या घरकुलांना युध्दपातळीवर मान्यता देण्याच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या. घरकुलांची कामे वेगाने सुरू आहेत. साडेचार महिन्याच्या कालावधीत सव्वालाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या फेजमधील घरकुलांच्या मान्यता अंतिम टप्प्यात आहेत. सव्वा वर्षात सुमारे ३० लाख घरकुलांचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे