single-post

साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे

केंद्र सरकारने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना १ ऑगस्ट रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे

01 August, 2025

 साहित्य क्षेत्रामध्ये अनेक साहित्यकांना अनुकूल वातावरणामध्ये साहित्य निर्मिती करण्यासाठी बळ मिळाले. शक्ती मिळाली. बुद्धिमत्ता प्राप्त झाली. त्या सर्वांनीच साहित्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. पण सर्वात लक्षवेधी ठरले म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय. गरीबाच्या झोपडीमध्ये क्रांती जन्माला येते या वाक्याचा अर्थ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यामुळे ओळखला गेला आहे. साहित्य निर्मिती आणि चळवळीतील योगदान हे रथाचे दोन चाके आहेत. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्वांत उजवे ठरत आहेत.

जग बदलूनी घाव... सांगून गेले आम्हा भीमराव... असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरव करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला फकीरा कादंबरी अर्पण केली होती. यातूनच त्यांच्या चळवळीची दिशा स्पष्ट झाली आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीचा ज्योत विझवण्याचा प्रयत्न होत असताना लोकशाहीची आठवण कायम राहत आहे. कुणाची सत्ता असली तरी अन्याय सहन करणारा मागासवर्गीय पेटून उठत नाही. याची नव पिढीला खंतही वाटते आणि चिंता ही वाटते. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये खेड्यापाड्यातील डोंगर गावकुसा बाहेर राहणारे गरीब, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांना आपल्या लेखणीतून नायक बनवण्याचे काम लोकशाहीर

अण्णाभाऊ साठे यांनी केलेले आहे. एक ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्म घेतलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी निधन पावले. या ३९ वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या साहित्याने जगभरच्या साहित्यकांना प्रभावित केलेले आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीची मुळे त्यांना जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांच्या साहित्याचे भाषांतर करण्यात आले. विशेषता रशियन लोक आजही

साहित्यिक म्हणून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची आठवण काढतात.आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विश्वरत्न या किताबावर अधिकार आहे. त्याची सुरुवात आपल्याला भारतरत्न या किताबाने करायचे आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे अखंड मुंबई आजही कायम राहिले आहे. वैजयंता, फकीरा, चिखलातील कमळ, चिटणीसांचे भेट, चंदन, वारणीचा वाघ अशा अनेक कथा कादंबऱ्यातून मराठी माणसांच्या स्वाभिमानाची व कर्तबदारी आणि धाडसाचे वर्णन केलेले आहे.

माझी मैना गावावर राहिली... माझे जीवाची होतीय कायली.. ही गण गवळण म्हणजे महिला शक्तीला मानवंदना ठरलेली आहे. अशा यालोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब द्यावा. यासाठी दिः२८ जुलै २०२० रोजी सामाजिक न्याय  राज्य मंत्री भारत सरकार आदरणीय श्री रामदास आठवले यांनी सुद्धा आपल्याला पत्र पाठवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा अशी मागणी केलेली आहे. या गोष्टीलाही आता पाच वर्षे पूर्ण झालेले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब द्यावा  अशी


महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची ही तीच इच्छा आहे. याबाबत गांभीर्याने आगामी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त दिः १ ऑगस्ट २०२५ रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची घोषणा करावी. अशी मागणी सामाजिक चळवळीचे खंदे समर्थक अमोल पाटोळे, सुरेश बोतालजी, रमेश गायकवाड, प्रेमानंद जगताप आणि मराठी साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्या साहित्यिकांनी केली आहे. या महान लोकशाहीरांना सातारा जिल्ह्याच्या वतीने विनम्र अभिवादन करून त्यांच्या लेखणीला जय भीम... लाल सलाम जय संविधान करतो...

-पत्रकार अजित जगताप, मु. पोस्ट, सायगाव ता.जावळी, जिल्हा सातारा मो.९९२२२४१२९९