कोरेगाव महामार्गावरील वसना नदीवर नवीन पूल उभारण्यात यावा -सुरेश बोतालजी
मेघा इंजीनियरिंग कंपनीने केलेल्या कामाची एस आटी मार्फत चौकशी करा
18 June, 2025
कोरेगाव दि.१७ -लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव वसना नदी पात्रावर ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्यात यावा तसेच या पूलाची उंची रेल्वे पूला एवढी करावी,पूलाची रूंदी ५० फूट करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.तसेच मेगा इंजिनिअरिंग या कंपनीने केलेल्या कामाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी केलेली आहे.
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराच्या वसना नदी पात्रावर ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्यात यावा तसेच लगत असलेल्या रेल्वेच्या पूलाएवढी उंची करावी,पूलांची रूंदी साधारणपणे ५० फुटी असावी , या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते म्हणून मुलाची रुंदी 50 फुटी असावी,या पुलाचे काम तात्काळ सुरू करावे. कोरेगाव हा नॅशनल हायवे असल्यामुळे व सातारा लातूर महामार्ग असल्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते तसेच रस्ते अरुंद असल्यामुळे प्रवासी वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत,म्हणून तात्काळ नवीन फुल उभारण्यात यावा तसेच मेगा इंजिनिअरिंग या कंपनी केलेल्या कामाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, मेगा इंजिनिअरिंग कंपनीने दर्जेदार काम केले नसल्यामुळे अनेक सामाजिक संघटनानी,आवाज उठवलेला होता परंतु त्या सर्व आवाजाला राज्य सरकारने ,केंद्र सरकारने केराची टोपली दाखवलेली आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी करावी.
रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांचे या सर्व कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या दिरंगाईमुळे कामे रखडली आहेत. या कंपनीकडून काम काढून घ्यावे, दुसऱ्या ठेकेदाराकडे हे काम तात्काळ देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी केलेली आहे.
सातारा-पंढरपूर महामार्गावर कोरेगाव गावाजवळ वसना नदीवर ब्रिटिश कालीन पूल बांधण्यात आला होता. या पुलाची लांबी सुमारे १६७ फूट होती आणि रुंदी १९.५ फूट होती. ब्रिटिश कालीन काळात बांधलेला हा पूल त्या काळातील स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण मानला जातो.
सातारा जिल्ह्याच्या गॅझेटियरनुसार, वसना नदीवरील हा पूल सातारापंढरपूर रोडवरील महत्त्वाचा पूल होता. या पुलाच्या बांधकामामुळे कोरेगाव आणि आसपासच्या भागांतील वाहतूक सुलभ झाली होती. ब्रिटिश कालीन स्थापत्यशास्त्र आणि बांधकाम तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा पूल बांधण्यात आला होता, परंतु आता या पूलाचे वय शंभरी पूर्ण केलेली असावी आणि त्यामुळेच या पुलाची टिकाऊ पणा किती असेल हे सांगता येत नाही ,परंतु पुढील काळात मोठा अनर्थ होण्यापेक्षा हा ब्रिटिश कालीन पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात यावा अशी मागणी बोतालजी यांनी केलेली आहे.
रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनी अपेक्षित कामे गतीने पूर्ण करू शकत नाही, हे कोरेगाव कराच्या लक्षात आले आहे. ना. नितीन गडकरी यांच्या कडे या अनुषंगाने पत्रव्यवहार करणार असल्याचे बोतालजी यांनी म्हटले आहे.
पावसापूर्वी ‘बांधकाम’विभागाकडून पुलांची पाहणी; ब्रिटिशकालीन पुलांची नव्याने पुनर्बांधणी करावी-सुरेश बोतालजी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील तसेच गावांना जोडणाऱ्या साकव पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील पुलांची मान्सूनपूर्व पाहणी करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटिशकालीन पुलांनी वयाची शंभरी ओलांडली असून, ते आजही वाहातुकीसाठी वापरात आहेत. त्यामुळे भविष्यातील मोठा धोका ओळखून जिल्हाव राज्य प्रशासनाने जुन्या पुलांच्या जागी नवीन पुलांची बांधणी करणे खूप गरजेचे बनले आहे.सातारा जिल्ह्याचे भौगाेलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक पूर्व, तर दुसरा पश्चिम. पश्चिमेकडील सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई, कऱ्हाड, पाटण हे तालुके अतिपर्जन्यवृष्टीचे आहेत. ब्रिटिश राजवटीत ठिकठिकाणी पुलांची उभारणी करण्यात आली. यातील बहुतांश पूल हे नद्यांवर असून, त्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. हे पूल ऊन, वारा, अतिवृष्टी अन् अवजड वाहतुकीमुळे कमकुवत होऊ लागले आहेत. गावांना जोडणाऱ्या साकव पुलांची अवस्थाही काहीशी अशीच आहे.रविवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील साकल पूल अचानक कोसळला. यामध्ये जीवितहानी तर झालीच शिवाय काही पर्यटक नदीत वाहून गेले. या घटनेनंतर जिल्ह्यातील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. नद्या, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर अनेक लहान-मोठे पूल पाण्याखाली जातात. बऱ्याचदा पुलांचा काही भाग वाहून जातो, दगड सैल होतात. त्यामुळे बांधकाम विभागाकडून मान्सून सुरू होण्यापूर्वी पुलांची तपासणी केली जाते. यंदा देखील ३० मीटर व त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या पूर्व, पश्चिम भागातील ३२ पुलांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, शतकाहून अधिक काळ सेवेत असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’ आहे.कोरेगांव वसना नदीवरील पूलाने शंभरी पार केलेले असून त्याची तपासणी करण्यात यावी तसेच हा पूल तात्काळ पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी केले आहे.
पुणे व सातारा जिल्ह्याला जोडणारा नीरा नदीवरील सारोळा पूल गेली अनेक वर्षेत चर्चेत आहे. कारण या पुलावरून वाहन मार्गस्थ झाल्यानंतर बसणाऱ्या हादऱ्यांनी प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकतो.या पुलावर आजवर अनेक अपघात घडले आहेत. आत्महत्येचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात शोधमोहीम राबवत असताना पूल जोडण्यासाठी वापरण्यात आलेले काही नटबोल्ट निघाले असल्याची धक्कादायक बाब रेस्क्यू टीमच्या निदर्शनास आली.याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला सूचित करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचे शिरवळ ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बांधकाम मंत्र्यांनीच प्रश्न गांभीर्याने घ्यावा..सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यमार्ग व जिल्हा मार्गावरील पुलांचे वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट (सुरक्षा तपासणी) केले जाते. पुलांमध्ये काही किरकोळ किंवा मोठी दुरुस्ती असेल, तर ती तातडीने केली जाते. मात्र, ब्रिटिश आमदनीत उभारण्यात आलेल्या पुलांचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’ आहे. दोन वर्षांपूर्वी वाईच्या कृष्णा नदीवरील जुना पूल पाडून त्याजागी नवीन पुलाची बांधणी करण्यात आली. मंत्री मकरंद पाटील व कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव तसेच वाई सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे महेश गोंजारी यांच्या प्रयत्नातून वाई येथील नवीन पूल उभारण्यात आलेला आहे . सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ब्रिटिशकालीन पुलांसाठी ‘वाई प्रकल्प’ राबवावा, सातारा जिल्ह्यात सर्वत्र वापरण्यात यावा अशी अपेक्षा आहे.
संगम माहुली येथे कृष्णा नदीवर असलेला कृष्णा पूल, वडूथ-आरळे व वाढे येथील दोन ब्रिटिशकालीन पूल, मेढा-महाबळेश्वर मार्गावर वेण्णा नदीवरील पूल, सातारा येथे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाढे हद्दीत असलेला जुना पूल, यांसह कऱ्हाड, पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई या तालुक्यांतील अनेक साकव पुलांची अवस्था गंभीर आहे. तरीही या पुलावरील वाहतूक अखंड सुरू आहे. या सर्व पूलांचे ऑडिट करण्यात येवून लवकरात लवकर पूल नवीन बांधण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बोतालजी यांनी केले आहे