single-post

महिलाच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज

महिलाच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज

15 February, 2025

महिलाच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज  : ॲड बगाडे

             कोरेगाव दि. ८ फेब्रुवारी, रयत शिक्षण संस्थेचे, डी.पी॰भोसले कॉलेज कोरेगाव येथे अंतर्गत तक्रार निवारण समिती मार्फत व्याख्यान आयोजित केले. महिलाच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याच प्रमाणे त्यांना विविध अधिकाराची माहिती असणे याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन   कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथि ॲड. बगाडे यांनी केले. महिलाच्या अत्याचारात वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर महिलांनी आर्थिक बौद्धिक व सामाजिक दृष्ट्या स्वावलंबी बनणे आवश्यक आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले. समाजामध्ये विविध ठिकाणी महिलांच्या वर अन्याय अत्याचार होत असतात. हे अन्याय किंवा अत्याचार कमी करायचे असतील तर सजगता आवश्यक आहे त्याचबरोबर महिलांनी कायद्याचा गैरवापर ही करता कामा नये असे मत त्यांनी व्यक्त केले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ.एल.डी.कदम होते. विद्यार्थीनीमध्ये कायद्याची साक्षरता निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी अशा प्रकारचे विविध कार्यक्रमाचे नियोजन केले पाहिजे असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या चेअरमन सौ. ए. एस.साळुखे, डॉ. एस. एस.यादव, डॉ. बी. एस.चव्हाण, श्री. डी. डी. पाटील, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार  डॉ. एस. आर. कुलकर्णी यांनी मानले आणि कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती. रणदिवे पी.पी. यांनी केले.